राहुरी बाजारपेठेतील 4 दुकाने फोडणारा चोरटा जेरबंद

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
राहुरी ः राहुरी शहरात बाजारपेठेतील 4 दुकाने फोडून घरफोडी करून चोरी करणारर्‍या सराईत चोरnike air max pre day air max goaterra 2.0 max white shoes mens nike air max air max goaterra 2.0 air max goaterra 2.0 air jordan 4 retro military black wmns air max 270 air jordan retro 1 mid casual shoes air max goaterra 2.0 air jordan 4 retro military black wmns air 1 mid air jordan 4 retro military black cheap cheap jordans wmns air 1 mid ट्यांना 4 दिवसात पकडण्यात अहमदनगर एलसीबी व राहुरी पोलिसांच्या टिमला यश आले आहे. या शोध मोहिमेत आरोपींना पकडण्यात राहुरीतील सीसीटीव्ही कॅमेर्‍याची महत्त्वाची भूमिक ठरली आहे. आरोपी दगडुबा मुकुंदा बोर्डे (रा.पेरजापुर ता.भोकरदन जि.जालना) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला दि.29 फेब्रुवारी 2024 पर्यंत न्यायलयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
एसपी राकेश ओला, अहमदनगर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, श्रीरामपूर डिवायएसपी डॉ.बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुुरी पोलिस ठाण्याचे पोनि.संजय आर.ठेंगे, पोहेकॉ.सुरज गायकवाड, पोहेकॉ.राहुल यादव, पोहेकॉ. विकास वैराळ, पोहेकॉ बाबासाहेब शेळके, पोहेकॉ.विकास साळवे, पो.कॉ.प्रमोद ढाकणे, पोकॉ अमोल गायकवाड, नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर व पो.ना.सचिन धनद, पो.ना.संतोष दरेकर, श्रीरामपूरचे पोना.रामेश्वर वेताळ आदिंच्या टिमने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.19 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 8 वा ते दि.20 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8 वाजे दरम्यान राहुरी शहरातील विविध दुकाने फोडून एकूण 46 हजार रुपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात आरोपींनी चोरी केलेली होती. या घटनेच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गु.र.नं ख 181/2024 भादंवि.कलम 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यामध्ये आरोपीबाबत काहीएक माहिती नसतांना गुन्हयाचा तांत्रीक पुराव्याच्या आधारे व राहुरी शहरातील सीसीटीव्ही. फुटेजवरुन केलेल्या तपासामध्ये एक संशयीत आरोपीची माहिती उपलब्ध झाली. माहिती सोशल मिडीयाच्या आधारे प्रसार केल्याने आरोपी दगडुबा मुकुंदा बोर्डे (रा.पेरजापुर ता.भोकरदन जि. जालना) हा इगतपुरी पोलीस ठाणे (जि.नाशिक) येथे मिळून आला. आरोपीस ताब्यात घेऊन राहुरी पोलीस ठाण्यात आणून आरोपीस गुन्हयामध्ये 24 फेब्रुवारी 2024 रोजी अटक करुन गुन्हाही उघडकीस आणला. आरोपीस प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालय राहुरी यांच्या समक्ष हजर करण्यात आले. आरोपची दि.29 फेब्रुवारी 2024 रोजी पोलीस कोठडी मिळाली आहे. गुन्हयाचा अधिक तपास राहुरी पोलिस ठाण्याचे पोहेकॉ.बाबासाहेब शेळके हे करत आहेत.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी एक सीसीटीव्ही. कॅमेरा दुकानासाठी व एक सीसीटीव्ही.कॅमेरा शहरासाठी अशी संकल्पना राबविलेले आहे. या संकल्पना आधारेच सीसीटीव्ही. कॅमेराच्या आधारे आरोपीचा शोध होऊन गुन्हा उघडकीस आलेला आहे. राहुरी पोलीस ठाण्यामार्फत आवाहन करण्यात येते की, राहुरी तालुक्यातील सर्व नागरिक, व्यापारी, दुकानदार यांनीही विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या संकल्पनेस प्रतिसाद देऊन सीसीटीव्ही.कॅमेरा बसवावेत, असे आवाहन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!