राहुरीत दोघांना गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुससह पकडले ; एलसीबीची कारवाई

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर-
राहुरी येथे विक्री करण्याच्या उद्देशाने एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस बेकायदशिररित्या जवळ बाळगणा-या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे.  नवनाथ साहेबराव गोर्डे (वय ३४, रा. पोहेगांव, ता. कोपरगांव), समाधान बाबासाहेब चव्हाण (वय २५, रा. कोपरगांव बेट, ता. कोपरगांव) असे पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोसई सोपान गोरे, पोहेकॉ मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोना संतोष लोढे, विजय ठोंबरे, पोकॉ सागर ससाणे व रोहित येमुलं आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


याबाबत समजलेले माहिती अशी की, एलसीबीचे पोनि अनिल कटके यांना  दोनजण गावठी कट्टा व जिवंत काडतसे विक्री करण्यासाठी राहुरी बसस्टॅण्ड परिसरात येणार आहे. आता लागलीच गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाली. पोनि कटके यांनी राहुरी परिसरात अवैध धंद्यावर कारवाईसाठी पेट्रोलिंग करत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना माहिती देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्याप्रमाणे एलसीबी पथकाने दोन पंचासह मिळालेल्या बातमीचे ठिकाणी राहुरी बसस्टॅण्ड परिसरात सापळा लावून थांबलेले असतांना थोड्याच वेळात दोनजण संशयीतरित्या आजुबाजूला टेहळणी करीत पायी येतांना दिसले. पोलीस पथकाची खात्री झाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना घेराव घालून ताब्यात घेतले. दोन्ही संशयितांना पोलीस असल्याची ओळख सांगून त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव व पत्ता सांगितला. पथकाने  त्याची अंगझडती घेतली असता नवनाथ गोर्डे याचे अंगझडतीमध्ये एक गावठी बनावटी कट्टा व दोन जिवंत काडतूसे असे एकूण ३१ हजार  रु. किं. मुद्देमाल मिळून आला. त्यांना परवान्याबाबत विचारपुस केली असता सुरुवातीस त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना अधिक विश्वासात घेऊन चौकशी करता त्यांनी गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे विक्री करण्याचे उद्देशाने आलो अशी कबुली दिल्याने त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. याबाबत एलसीबीचे पोकाॅ रोहित आंबादास येमुल  यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. ५८९ / २०२२, आर्म ॲक्ट कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील कार्यवाही राहुरी पोलीस करीत आहेत.
आरोपी नवनाथ साहेबराव गोर्डे हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्याविरुध्द विविध पोलीस ठाणेस दरोडा, जबरी चोरी, आर्म ॲक्ट व अवैध दारुविक्री असे एकूण गंभीर स्वरुपाचे १२ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तर
आरोपी समाधान बाबासाहेब चव्हाण हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुध्द विविध पोलीस ठाणेस लोकसेवकाचे आदेशाचे उल्लंघन, अवैध दारुविक्री व आर्म ॲक्ट असे एकूण गंभीर स्वरुपाचे ५ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!