राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत गजानन हाॅस्पिटलमध्ये मूक बधीरपणाची मोफत तपासणी

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर :
अहमदनगरमध्ये कान, नाक व घसा विकारांच्या उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या गजानन हाॅस्पिटलमध्ये मूक बधीरपणाची तपासणीचे ‘मॅपिंग व काॅक्लियर इम्प्लांट सर्जरी समुपदेशन’ शिबिर होणार आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत हे शिबिर (रविवार दि. 30 जुलैला) आयोजित केले आहे, अशी माहिती कान- नाक- घसा तज्ज्ञ डाॅ. गजानन माेहनीराज काशीद यांनी दिली. ज्ञानेंद्रिय म्हणून कानाने व्यवस्थित ऐकू येणे अतिशय महत्त्वाचे असते. त्या अनुषंगाने या शिबिरात सहा महिन्यांच्या बालकांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांची मूक बधीरपणाची माेफत तपासणी केली जाईल, असे डॉ. काशीद यांनी सांगितले.

या शिबिराचे उद्घाटन अहमदनगर जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डाॅ. संजय घाेगरे यांच्या हस्ते (रविवार दि. 30 जुलैला) सकाळी दहा वाजता अहमदनगर शहरातील दिल्ली दरवाजा येथील गजानन हाॅस्पिटल येथे हाेणार आहे. जिल्हा रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ. साेनाली बांगर, अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. साहेबराव डावरे यांच्यासह गजानन हाॅस्पिटलचे कान-नाक-घसा तज्ज्ञ डाॅ. गजानन काशीद, कान-नाक- घसा तज्ज्ञ डाॅ. महावीर कटारीया, डाॅ. श्रीकांत पाठक, डाॅ. वैजनाथ गुरवले, ऑडिओलॉजिस्ट डाॅ. प्रशांत निर्मळे, ऑडिओलॉजिस्ट डाॅ. विठ्ठल उंडे, ऑडिओलॉजिस्ट डाॅ. अमृता दिवाणमल, बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे अहमदनगर जिल्हा समन्वयक विजय दळवी आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी बाल स्वास्थ्य वैद्यकीय अधिकारी यांचे पथक देखील उपस्थित असेल.

अहमदनगरमध्ये मागील १७ वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले कान-नाक- घसा तज्ज्ञ डाॅ. गजानन काशीद, ऑडिओलॉजिस्ट डाॅ. प्रशांत निर्मळे, ऑडिओलॉजिस्ट डाॅ. विठ्ठल उंडे, ऑडिओलॉजिस्ट डाॅ. अमृता दिवाणमल हे शिबिरात सहभागी रुग्णांची तपासणी करणार आहेत.
माणसाला काेणत्याही वयात कोणत्याही कारणामुळे ऐकायला कमी येऊ शकते. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत कोणालाही कानाची समस्या उद्भवू शकते. कमी ऐकायला येण्यामुळे दैनंदिन जीवनशैलीत अनेक समस्या निर्माण हाेतात. वेळीच तपासणी व उपचार केल्यास गंभीर परिणाम टाळता येऊ शकतात. त्याकरिता ‘मॅपिंग व काॅक्लियर इम्प्लांट सर्जरी समुपदेशन’ शिबिर उपयुक्त ठरेल, असे डॉ. काशीद यांनी सांगितले. शिबिरातील सहभागी रुग्णांची मूक बधीरपणाची ‘मॅपिंग व काॅक्लियर इम्प्लांट’ ही तपासणी मोफत केली जाईल. तपासणीअंती जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय निर्देशानुसार शस्त्रक्रिया करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मूक बधीरपणाची तपासणी करण्यास इच्छुक असणाऱ्या रुग्णांनी त्यांच्याकडील पूर्वीची वैद्यकीय तपासणी व उपचारांची कागदपत्रे घेऊन येणे आवश्यक आहे.
शिबिरात सहभागी होण्याकरिता नाव नोंदणीसाठी अहमदनगर येथील गजानन हाॅस्पिटल (0241) 2325425, किंवा ऑडिओलॉजिस्ट डाॅ. प्रशांत निर्मळे (8484078402), किंवा ऑडिओलॉजिस्ट डाॅ. विठ्ठल उंडे (9604201764) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन डाॅ. गजानन काशीद यांनी केले आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे अहमदनगर जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका, परिचारीका, मदतनीस, आशा वर्कर्स हे शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!