संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर : राष्ट्रीय चर्मकार महासंघ (अराजकीय सामाजिक संघटनेमध्ये) नवीन पदाधिकारी यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
क्रांतिकारी नेते, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष माजीमंत्री बबनराव घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय चर्मकार महासंघ राहुरी तालुका कार्यकारणी हॉटेल भाग्यश्री येथे पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. यावेळी या कार्यकमाचे अध्यक्ष आमदार भाऊसाहेब कांबळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश सचिव दत्तात्रय गोतिसे, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष दिलीप कानडे, नगर उत्तर जिल्हाध्यक्ष अशोकराव कानडे, युवक जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ दुशिंग, महिला उत्तर जिल्हाध्यक्षा मनिषाताई पोटे, अहमदनगर जिल्हा दक्षिण युवक कार्यध्यक्ष सुभाषराव भागवत, राहाता महिला तालुकाध्यक्षा सौ.प्रितीताई कानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन राहुरी तालुका कार्यकारणी पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी तसेच या कार्यक्रमासाठी राहुरीचे पोलीस उपनिरीक्षक निलेश वाघ, पोलीस उपनिरीक्षक श्री तुषार धाकराव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनिषाताई पोटे यांनी केले. सूत्रसंचालन सुभाषराव भागवत यांनी केले आणि आभार बाळासाहेब साळवे यांनी केले.
👉नवनिर्वाचित पदाधिकारी उत्तर नगर जिल्हा व तालुका पदाधिकारी मनिषाताई पोटे(महिला जिल्हाध्यक्षा), बाळासाहेब कांबळे वांबोरी(जिल्हा प्रसिद्धीप्रमुख), संतोषभाऊ तेलोरे सोनई(जिल्हा प्रसिध्दीप्रमुख), अण्णासाहेब देवरे (जिल्हा सल्लागार ), जिजाबा चिंधे (जिल्हा संघटक), कैलास चिंधे (युवक जिल्हा उपाध्यक्ष)
👉राहुरी तालुका पदाधिकारी – राजाभाऊ कांबळे (राहुरी तालुकाध्यक्ष), कैलास ठोकळे (राहुरी तालुका उपाध्यक्ष), विजय तेलोरे (राहुरी तालुका सचिव), जालिंदर देशमुख (राहुरी तालुका कार्याध्यक्ष), विजय कांबळे (राहुरी तालुका सल्लागार)
👉राहुरी तालुका युवक पदाधिकारी – सुनील देशमुख (राहुरी तालुकाध्यक्ष), प्रसाद दादा लोखंडे (राहुरी तालुका उपाध्यक्ष), प्रशांत कांबळे (राहुरी तालुका सचिव), लक्ष्मण तुपे (राहुरी तालुका सहसचिव), अभिषेक साळवे (राहुरी तालुका कार्याध्यक्ष)
👉राहुरी तालुका महिला पदाधिकारी
सौ योगिताताई लक्ष्मण तुपे (राहुरी तालुकाध्यक्षा), सौ शिलाताई जालिंदर देशमुख (राहुरी तालुका उपाध्यक्षा)
👉राहुरी तालुका शिक्षक पदाधिकारी – एकनाथ अर्जुन सोनवणे (राहुरी तालुकाध्यक्ष), मच्छिंद्रनाथ देशमुख (राहुरी तालुका उपाध्यक्ष), आदिक सोनवणे (राहुरी तालुका सचिव), अमोल कदम (राहुरी तालुका सहसचिव), बापूसाहेब जाधव (राहुरी तालुका कार्याध्यक्ष) यांची नियुक्ती करण्यात आली.