संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई: राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर मोठ्या कालावधीनंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेण्यात आली होती. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीत मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच राज्यातील घडामोडींवर चर्चा करण्यात आली आहे. मराठा आरक्षण,पदोन्नती आरक्षण,ओबीसी आरक्षणावर देखील चर्चा करण्यात आली आहे. राज्यात कोरोनाचं सकट वाढत असताना लसीकरणात येणाऱ्या अडथळ्यांवरही चर्चा झाली असल्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे. म्युकरमायकोसिसच्या वाढत्या आजारावर चिंता व्यक्त करत त्याचाही आढावा घेण्यात आला आहे.
लसीकरणामध्ये येत असलेली अडचण कशी दूर होईल याबाबत चर्चा झाली आहे. सर्व मंत्र्यांनी आग्रह केल्यानंतर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी आपण स्वतः सिरममध्ये फोन करुन चर्चा करु असे आश्वासन मंत्र्यांना बैठकीत दिले आहे. त्याचबरोबर म्युकर मायकोसिसच्या औषध आणि इंजेक्शनचा तुटवडा कसा दुर करता येईल यावर चर्चा करण्यात येणार आहे. केंद्र सरकार बॅंक अॅक्ट १९४९ त्याच्या बदल करुन रिझर्व्ह बँकला अधिकार देऊन राज्यातील सहकारी बँकेचे अधिकार संपवण्याचा डाव केंद्र सरकार रचत आहे. जिल्हा बँक कशा संपतील, नागरी सहकारी बँकांना अडचणीत आण्याचा अशा प्रकारचा कार्यक्रम सुरु झाला आहे.
👉सहकारी संस्थेला संपवण्याचा प्रयत्न
राज्य सरकारने याच्याबाबतीत एक सहकार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स तयार केली पाहिजे. यामध्ये तीन पक्षाचे मंत्री असतील आणि सहकार क्षेत्रातील बँकेत काम करणारे सगळे तज्ञ असतील आणि त्यांनी बसून या अमेंडमेंटला कसे थांबवता येईल यावर चर्चा करण्याचे ठरले आहे. शरद पवार सहकार खात्याचे मंत्री होते तेव्हा मौलिक अधिकार देण्याचा निर्णय केला होता. परंतु सध्याचे मंत्री या सहकारी संस्थेला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारच्या वतीने शरद पवारांनी निर्देश दिले आहेत की याकडे लक्ष दिले पाहिजे. कायद्याने यावर लक्ष दिले पाहिजे अशी पाऊले उचलण्यात येणार आहेत.
👉ओबीसी आरक्षणावर चर्चा
न्यायालयाने ओबीसी आरक्षणावर निर्णय दिल्यानंतर महाराष्ट्रात सध्या जे ओबीसी आरक्षणाबाबतीत प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याच्याबाबतीत आता मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली तिन्ही पक्षाचे नेते, वकिल यांची बैठक आहे. जे आरक्षण इतर मागासवर्गीयांना मंडल आयोगाच्या माध्यमातून २७ टक्के देण्यात आले होते. राजकीय आरक्षण संपण्याचे चित्र निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुख्यमंत्री असताना मंडल आयोगाची स्थापना केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट मत आहे की, ओबीसी समाजाला, नोकरी, शिक्षण आणि राजकीय आरक्षण असेल हे आबाधित राहिले पाहिजे आणि आजच्या बैठकीत स्पष्ट भूमिका घेतली आहे.
👉गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे
मराठा आरक्षणाबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये जो गरीब मराठा समाज आहे त्यांना निश्चित रुपाने आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी कायदा केला. भाजप सरकार असताना एकमताने कायदा करण्यात आला आहे. परंतु इतर मागण्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील आहोत असे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
👉पदोन्नतीच्या आरक्षणाबाबत चर्चा
पदोन्नतीच्या आरक्षणाबाबत वीशेष लक्ष दिले पाहिजे. कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये यासाठी दक्षता घेतले पाहिजे. तिन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. भविष्यात याबाबत आदेश जारी होणार आहेत.
👉राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन साजरा करणार
येत्या १० जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन सोहळा आहे. राज्यातील सर्व पालकमंत्री आणि मंत्री आपल्या जिल्ह्यातील पक्ष कार्यालयासोर झेंडावंदन करतील. या महाराष्ट्राच्या कार्यालयावर मोजके लोकं उपस्थित राहणार आहेत. झेंडा वंदन झाल्यानंतर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फेसबुकपेजवरुन लाईव्ह चर्चा केली जाणार आहे. असे राष्ट्रवादी नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे.