संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी – भारताच्या पंधराव्या राष्ट्रपतीपदी पहिली आदिवासी महिला श्रीमती द्रोपदी मुर्मू यांची निवड झाल्याबद्दल अहमदनगर जिल्ह्यात राहाता तालुक्यातील निमगाव- को. येथे ग्रामस्थांसह आदिवासी बांधवासोबत जल्लोष साजरा करण्यात आला आहे.
यावेळी उपसरपंच व साई सेवा पतसंस्थेचे चेअरमन अजय जगताप, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब गाडेकर, निमगाव विविध कार्यकारी सोसायटीचे व्हा. चेअरमन व ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ कातोरे पाटील, ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब कडलग, साई सेवा पतसंस्थेचे संचालक सतीश डेंगळे, माजी ग्रामपंचायत सदस्य धनंजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य विशाल गोसावी, साई सेवा पतसंस्थेचे संचालक सिकंदरभाई शेख, युवा कार्यकर्ते श्रीकांत कातोरे पा., राजूभाऊ कातोरे, आदिवासी समाजाच्या महिला व पुरुष, निमगाव को ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.