राम-शाम ला पाहिजे फक्त दाम,तरच ते करतात काम नाहीतर तुमच्या कामाचा चक्का जाम ; नगर आरटीओ अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभाराची वरिष्ठ लक्ष घालणार का ?

राम-शाम ला पाहिजे फक्त दाम,तरच ते करतात काम नाहीतर तुमच्या कामाचा चक्का जाम ; नगर आरटीओ अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभाराची वरिष्ठ लक्ष घालणार का ?

नगरच्या आरटीओ यांनी मी नाही त्यातली ची… भूमिका स्पष्ट करावी ; आरटीओ आयुक्तांनी याची दखल घेऊन कारवाई करावी

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : येथील आरटीओ अधिकारी अपवादात्मक एजंटच्या माध्यमातून दररोज लाखो रुपयांचा मलिदा गोळा करण्याचा उद्योग चालू आहेत. या संबंधित आरटीओ अधिकाऱ्यांची व संबंधित एजंटचीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी झाल्यास आलेली मालमत्ता व बॅंकबॅलन्स‌ कोठून आला, याबाबत सर्वच माहिती समोर येईल…
अहमदनगर आरटीओ कार्यालयात संबंधित अधिकारी व त्यांच्या मेहरबानीने कार्यालयात वाहनांच्या कागदपत्रांबाबतच्या कामाचे ३०० रुपयांचे काम हजारो रुपये सांगून एकप्रकारे मोठा मलिदा गोळा केला जातो… याबाबत या लक्ष्मी दर्शनाची गोडीगुलाबी चर्चा सगळीकडेच सुरू आहे. आता तरी या अहमदनगर आरटीओ कार्यालयाची राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकदा तरी गोपनिय पद्धतीने सर्वेक्षण केल्यास अनेक मोठे उद्योग बाहेर नाही आले तर नवलच!.. यात संबंधित अधिकारी व एजंटची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माहिती घेतल्यावर अनेक उद्योग बाहेर बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही..


👉आरटीओ कार्यालयाशी जवळकी.. चर्चा जोरात
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) ने मागील काही महिन्यात ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांकडून मोठी रक्कम घेऊन बोगस हेल्थ सर्टिफिकेट दिल्याची चर्चा सध्या शहरात वेग घेत आहे. राम (क्रेटा लवर पंटर) कलेक्शन करतो, तर शाम काम मार्गी लावतो‌. ही राम-शाम ची जोडी भयंकर भ्रष्टाचार करत असल्याचे बोलले जाते.
राम (क्रेटा लवर पंटर) जरी देव असल्यासारखा शुद्ध वागत असला तरी त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही.कारण देवाच्या वेशात वावरणारा हा राम (क्रेटा लवर पंटर) कामासाठी वणवण भटकत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) मध्ये आलेल्या गोरगरीब लोकांचे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लचके तोडत आहे.
या सर्व प्रकाराला शाम पाठीशी घालत आहे.शामने जरी गरिबांची सेवा करण्याची,भ्रष्टाचार न करण्याची शपथ घेतली असली तरी ती मी ती शपथ चेष्ठेत घेतली होती, आपला पहिला धर्म लक्ष्मी जपण्याचा आहे, असे शाम दारू पीत असतांना खासगीत सांगतो.
काही स्वयंघोषित गुंडांना उत्सवांसाठी फंडिंग करून स्वतःला नगरचा वाली समजणार हा शाम कर्तव्याला आपला धर्म कधी समजेल, हा सध्या नगरकरांचा सवाल आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!