संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई : ”काहींना बाळासाहेब ठाकरे असल्यासारखे वाटते, राज ठाकरे आता हिंदुत्वाची शाल पांघरत आहेत. राज ठाकरे म्हणजे केमिकल लोचाची केस आहे, कधी मराठीच्या कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात यांनी कधी जनतेची कामं केलीत का? असा खणखणीत सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
मुंबईतील बिकेसी मैदानावरील सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा सुरु आहे. या सभेत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला.
”आज यांना हिंदुत्वाचा खोटा पुळका आला आहे, पण शिवसेनेचे हिंदुत्व नसते तर आज तुम्हीसुद्धा भोंग्यात असता असा टोलाही राज ठाकरेंसहीत भाजपलाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी लगावला.
”लगे रहो मुन्नाभाई चित्रपटासारखीच राज ठाकरे यांची स्थिती आहे. लगे रहो मुन्नाभाई चित्रपटात संजय दत्तला गांधीजी दिसतात मग संजय दत्तही गांधीगीरी करतो, तशीच केस आपल्याकडे आहे. शाल घेऊन फिरतात हल्ली. कधी मराठीच्या तर कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. चित्रपटातील मुन्नाभाईने लोकांचे भले करीत होता हा कुठला मुन्नाभाई? चित्रपटात शेवटी संजय दत्तला समजते की आपल्या डोक्यात केमिकल लोचा झाला” अशीच गत राज ठाकरेंची आहे असे नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी राज यांच्यावर शरसंधान साधले.