राज्य सरकारमुळेच ओबीसी आरक्षण रखडले : योगेश टिळेकर


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर :
राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने विश्वासघाताने मराठा समाजाचे आरक्षण गमावले तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागला हा देखील राज्य सरकारचा विश्वासघात आहे अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष माजी आ.योगेश टिळेकर यांनी केले. भाजपा ओबीसी मोर्च्याचा नगर शाखेचा मेळावा नाथकृपा मंगल कार्यालय काटवनखंडोबा येथे आयोजित केला होता.त्यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना श्री.टिळेकर बोलत होते.खा.सुजय विखे पा. पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर मालन ढोणे व गीतांजली काळे, प्रदेशचे शंकरराव वाघ, प्रकाश चित्ते, मेळाव्याचे समन्वयक बाळासाहेब भुजबळ, ओंकार लेंडकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.


श्री.टिळेकर पुढे म्हणाले भाजपाच्या गत राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण उच्च न्यायालयाने मान्य केले. पण, विद्यमान आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयात आरक्षणासाठी बाजू मांडण्यास कमी पडले आणि मराठ्यांना आरक्षण गमवावे लागले. तर ओबीसी आरक्षणावरून केंद्र सरकारवर टीका करणारे राज्य सरकार इम्पेरिकल डाटा अडीच वर्षात देऊ शकले नाही.त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागला.राज्याने ओबीसी आयोगाला निधी दिला नाही.मध्यप्रदेश सरकारने साडे तीन महिन्यात डाटा न्यायालयात देऊन ओबीसी आरक्षण वाचविले.तेव्हा आपल्या राज्य सरकारचा खोटेपणा , मध्यप्रदेश च्या निर्णयामुळे सिद्ध झाला.अशी टीका टिळेकर यांनी केली.
भाजपाच्या पाठिंब्याने विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या जनता दलाच्या सरकारने सर्वप्रथम ओबीसीला आरक्षण देऊन मोठा न्याय दिला. याची आठवण देत टिळेकर पुढे म्हणाले मोदी सरकारने ओबीसी आयोग स्थापन करून न्याय दिला. केंद्र सरकार मध्ये २७ मंत्री ओबीसी आहेत.मेडिकल साठी २७ टक्के आरक्षण दिले. महाज्योत योजना ,ओबीसींच्या शिक्षणाची तरतूद केली, राज्याच्या सरकारने नाव आडनावावरून डाटा गोळा केल्यास ओबीसींवर तो अन्याय ठरेल.त्यासाठी घरोघरी जाऊन डाटा गोळा करावा लागेल असे ते म्हणाले.ओबीसींच्या प्रश्नावर आक्रमक होत राज्यात ठिकठिकाणी मेळावे, आंदोलन करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
खा.विखे पाटील आपल्या भाषणात म्हणाले कि, राज्य सरकार मधील ओबीसी म्हणून जे मंत्री पदावर आहेत ते ओबीसींची बाजू मांडण्यात अपयशी ठरत आहेत.त्यांना समाजाच्या हक्काचे मंत्रिपद हवे पण, त्यांना समाजाशी देणेघेणे नाही.या विरोधात भाजप आता स्वस्थ बसणार नाही.ओबीसीसाठी पक्षाच्या संघर्षात आम्ही लोकप्रतिनिधीसह सर्व सहभागी राहणार आहोत.याप्रसंगी भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष भैय्या गंधे, दक्षिण जिल्हाध्यक्ष संतोष रायकर,माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब महाडिक, महिला पदाधिकारी आशा वाघ आदींची समयोचित भाषणे झाली.
प्रारंभी प्रास्ताविकात श्री किशोर डागवाले म्हणाले ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारची इच्छाशक्ती नाही.त्यामुळे भाजप या विरोधात आवाज उठवत आहे. भाजपच्या आवाजाचा राज्य सरकारने धसका घेतला आहे. पण कृती ते करत नाही.म्हणून राज्यात ठीकठिकाणी मेळावे-मोर्चे, आंदोलन टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सुरू केले.ओबीसी आरक्षण मिळाल्याशिवाय आता भाजप स्वस्थ बसणार नाही.
यावेळी लीला अगरवाल, सचिन पारखी, रामदास आंधळे, सुनील भिंगारे, दिलीप भालसिंग, माजी नगरसेविका लता शेळके, युवराज पोटे, श्री नाईक ,महेश तवले,कांचन खेत्रे,ज्योती डांगरे, बाबासाहेब सानप,अजय चितळे, नरेंद्र कुलकर्णी, मनेष साठे, नितीन शेलार, मिलिंद भालसिंग,सौ देवकर, मनोज ब्राह्मणकर, आदी उपस्थित होते.
भाजपच्या विविध आघाडीतील पदांवर सरपंच जांभुळकर,रेखा विधाते, आशा गायकवाड, स्वाती पवळे, वैशाली उदावंत, विद्या एक्कलदेवी, नीता माने, सुमित इप्पलपेल्ली, विक्रम शिंदे, पुंडलिक गदादे, चेतन क्षिरसागर, ईश्वर गुंड, पांडुरंग क्षिरसागर, ओमकार लेंडकर, नवनाथ हिरणे, मनोहर राऊत, मनीषा आघाव,नारायण धोंगडे, अनु गावडे, आदींची नियुक्ती करून त्यांना श्री.टिळेकर,खा. विखे, श्री.गंधे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी उद्धव काळापहाड यांनी सूत्रसंचालन केले. तर भाजपा ओबीसी मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी आभार मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!