राज्यातील 92 नगरपरिषदा, 4 नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर; 18 ऑगस्टला होणार मतदान

📢 महाराष्ट्राच्या 17 जिल्ह्यांतील 92 नगरपरिषद आणि 4 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचे बिगूल वाजले आहे. नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई-
राज्यात 17 जिल्ह्यांतील 92 नगरपरिषद आणि 4 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचे बिगूल वाजले आहे. नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. येत्या 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. तसेच, 19 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. या निवडणूकीच्या प्रक्रियेला 20 जुलैपासून सुरुवात होणार आहे.
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, क्लाहूपर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलढाणा या 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषद आणि 4 नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहे. (maharashtra elections 2022 nagar panchayat municipalities election announced)


निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, 20 जून रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करणार आहे. त्यानंतर, 22 ते 28 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत.
असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम उमेदवारी अर्ज उपलब्ध : 22 ते 28 जुलै.,अर्ज स्वीकारण्याचा कालावधी 22 ते 28 जुलै, अर्जाची छाननी : 29 जुलै, अर्ज मागे घेण्याची मुदत : 4 ऑगस्ट दुपारी 3 पर्यंत, उमदेवारी अर्जावरील आक्षेप : 8 ऑगस्ट, मतदानाचा दिनांक : 18 ऑगस्ट, मतमोजणी आणि निकाल : 19 ऑगस्ट
👉अ वर्गातील 6 नगरपरिषदा
भुसावळ, बारामती, बार्शी, जालना, बीड
,उस्मानाबाद
👉ब वर्गातील 28 नगरपरिषदा
मनमाड, सिन्नर, येवला, दौंडाईचा- वरवाडे, शिरपूर- वरवाडे, शहादा, अंमळनेर, चाळीसगाव, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, चाकण, दौंड, कराड, फलटण, इस्लामपूर,विटा, अक्कलकोट, पंढरपूर, अकलूज, जयसिंगपूर, कन्नड, पैठण, अंबेजोगाई, माजलगाव, परळी-वैजनाथ, अहमदपूर, अंजनगाव- सुर्जी
👉क वर्गातील नगरपरिषदा
कोल्हापूर, कुरुंदवाड, मुरगुड, वडगांव, औरंगाबाद, गंगापूर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!