👉 1 लाख 39 हजार संस्था रडारवर
👉पडताळणीचे धर्मदाय आयुक्त यांचे निर्देश
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई – राज्यातील ज्या सामाजिक संस्थांची नोंदणी रद्द झाली आहे. त्या विश्वस्त संस्थांची स्थावर व जंगम मालमत्ता आता सरकारजमा होणार आहे. संस्थांची नोंदणी रद्द झालेल्या संस्थांच्या मालमत्तांची पडताळणी करावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे धर्मदाय आयुक्तांनी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ट्रस्ट संस्थांची नोंदणी होत असते यातील अनेक संस्था नियमानुसार ऑडिट रिपोर्ट आणि चेंज रिपोर्ट सादर करत नाहीत तर अनेक संस्था या वर्षानुवर्ष निष्क्रिय असतात त्यांच्या मार्फत कोणतेच कामकाज होत नाही मात्र या नोंदणीकृत असल्याने धर्मदाय आयुक्त वावर निष्क्रिय संस्थांचा बोजा मात्र वाढत असतो या पार्श्वभूमीवर 13 सप्टेंबर 2017 रोजी तत्कालीन धर्मदाय आयुक्तांच्या निदर्शनास नुसार राज्यभरात अशा संस्थांची नोंदणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे तेव्हापासून एकूण आठ लाख 17 हजार 416 नोंदणीकृत संस्थांपैकी आता आतापर्यंत 1 लाख 39 हजार 516 संस्थांची नोंदणी रद्द केली गेली.
नोंदणी रद्द झालेल्या संस्थांच्या स्थावर आणि जंगम मालमत्ता वर धर्मादाय उपायुक्त किंवा सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी मालमत्तेची योग्य प्रकारे विक्री करून ती रक्कम सार्वजनिक न्यास प्रशासन निधीमध्ये जमा करण्याची कायद्यात तरतूद आहे.
नोंदणी रद्द झाल्यानंतर अनेक ठिकाणी संबंधित ट्रस्टची मालमत्ता सरकारजमा न होता ती अडकवली जाते विश्वस्त संस्थांची मालमत्ता खाजगी म्हणून त्याचा वापर केला जातो या प्रकाराला आळा घालण्यासाठी मालमत्तेची पडताळणी आणि तीच सरकार जमा करण्याची मोहीम धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून घेतली जाणार आह