यवतमाळ जिल्ह्यातील दुहेरी खूनातील ६ फरार आरोपींना ‘अ.नगर एलसीबी टिम’ने पकडले

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर
: यवतमाळ जिल्ह्यातील दुहेरी खुनाच्या गुन्ह्यातील ६ फरार आरोपींना अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील वांबोरी फाटा येथे सापळा लावून अहमदनगर एलसीबी टिम’ने पकडले. पवन बाजीराव वाळके (वय २३), निलेश दिपक थोरात (वय २४), गोपाल शंकर कापसे (वय २६), गणेश संतोष तोरकड (वय २१), गणेश शंकर कापसे (वय २४), अवि अंकुश चव्हाण (वय २२, सर्व रा. विटाळवार्ड, ता. पुसद, जि. यवतमाळ) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबी पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार एलसीबीचे पोहेकॉ संदीप पवार, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, शरद बुधवंत, पोना रविंद्र कर्डीले, विजय ठोंबरे, फुरकान शेख, विशाल गवांदे, अमृत आढाव, रोहित मिसाळ, शिवाजी ढाकणे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, कुटूंबियांना गांवातील पवन वाळके व त्याचे इतर साथीदारांनी किरकोळ वादावरुन कोयता व चाकूने मारहाण करुन गंभीर जखमी केले व चुलते राहुल हरीदास केवटे व चुलत भाऊ क्रिश विलास केवटे यांना जिवे ठार मारले आहे. या नयन अनिल केवटे (रा. हनुमंतबाबा मंदीरा जवळ, विटाळवार्ड, ता. पुसद, जि. यवतमाळ) यांच्या फिर्यादीवरून पुसद शहर पोलीस ठाणे ( जि. यवतमाळ) येथे गु.र.नं. ४७६/२०२३ भादविक ३०२, ३०७, १४३, १४४, १४७, १४८, १४९, २९४ सह अ.जा.ज.अ.प्र.का.क. ३ (२) (व्हीए), ३ (२) प्रमाणे आरोपींविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दाखल गुन्ह्यातील आरोपी महिंद्रा कंपनीचे मालवाहू टेम्पोमधून फरार झाले होते. पुसदर शहर पोलीसांनी फरार आरोपींचा तांत्रिक विश्लेषणाचे आधारे शोध घेत असताना आरोपी हे छत्रपती संभाजीनगर मार्गे अहमदनगरच्या दिशेने जात असल्याचे निदर्शनास आल्याने यवतमाळ एसपी यांनी अहमदनगर एसपी राकेश ओला यांना संपर्क करुन आरोपी व गुन्ह्याबाबत माहिती सांगण्यात आली होती. त्यानुसार एसपी श्री ओला यांनी अहमदनगर एलसीबी पोनि दिनेश आहेर यांना तपासाबाबत आदेश दिले होते. पोनि श्री आहेर यांनी एलसीबी टिम’ला तपास करीत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार एलसीबी टिम’ने गुरुवारी (दि.२० जुलै)१ वाजण्याच्या सुमारास अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर रोडने, वांबोरी फाटा येथे जाऊन सापळा लावला.या दरम्यान थोडाच वेळात एक महिंद्रा कंपनीचा मालवाहू टेम्पो येताना दिसला. पोलिसांना खात्री होताच टेम्पो चालकास थांबण्याचा इशारा करताच त्याने टेम्पो रस्त्याच्या बाजूला घेतला. टेम्पोत असणा-यांना पोलीस असल्याची ओळख सांगून त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे सांगितली. संशयीताकडे विचारपुस करता त्यांनी पुसद शहर पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हा केल्याचे कबुल झाल्याने त्यांना महिंद्रा कंपनीचे मालवाहू टेम्पोसह ताब्यात घेऊन पुसद शहर पोलीस ठाणे (जि. यवतमाळ) यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पुसद शहर पोलीस (जि. यवतमाळ ) हे करीत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!