…मुलीवरच बलात्कार करणाऱ्यास शिर्डी पोलिसांनी पकडले
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork (video)
शिर्डी : Shrid पुण्यात स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून गरोदर करणारा फरार आरोपीस जेरबंद करण्याची कारवाई शिर्डी डिवायएसपी संदीप मिटके यांच्या टिमने केली आहे. Crmie news
याबाबत समजलेली माहिती अशी की, गुरुवारी ( दि. २८ डिसेंबर २०२३) ला श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथील कर्मचारी अविनाश आदलिंगे व सुरक्षा अधिकारी आण्णासाहेब परदेशी यांनी शिर्डी डीवायएसपी संदीप मिटके यांना माहिती दिली की, मागील ३ दिवसांपासून एकजण साई उद्यान येथे राहण्यास आहे. डीवायएसपी श्री मिटके यांनी त्या संशयितास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने कबुली दिली की, माझ्याविरुद्ध वानवडी पोलीस ठाणे (पुणे) येथे बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. दीड महिन्यापासून बेंगलोर, राजस्थान, बागेश्वर धाम आणि शिर्डी येथे लपून राहत आहे, अशी माहिती आरोपीने दिली. याबाबत खात्री करण्यासाठी डिवायएसपी श्री मिटके यांनी वानवडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, यात आरोपीबाबत चौकशी केली असता समजले की, आरोपी विरुद्ध दि.१० नोव्हेंबर २०२३ रोजी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपीने (वय ५०) स्वतःच्या अल्पवयीन मुलीला (वय १६) जीवे मारण्याची धमकी देऊन तिचेवर एप्रिल २०२३ पासून वारंवार लैंगिक अत्याचार केले. त्यामुळे पीडित मुलगी ही सध्या ७ महिन्याची गरोदर आहे. त्याच्याविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ५४७/२०२३ भादवी कलम ३७६(२)(f),( j),३७६(२)(३),(n),३२३,५०६ सह बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,५ (j),(२)५ (L), ६, ८, १२ कलमान्वये गुन्हा दाखल आहे. त्यावेळे पासून आरोपी फरार आहे. या आरोपीस पुढील तपासकामी वानवडी पोलीस ठाणे पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.