संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
राहुरी- श्री संत गाडगे महाराज आश्रम शाळा राहुरीचे मुख्याध्यापक जगन्नाथ विठ्ठल सुर्यवंशी यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे औचित्य साधून श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड व संघटनेचे राज्य सचिव सुनिल गुलदगड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यांनी केलेल्या वृक्षलागवडीच्या संकल्पनेला प्रोत्साहन देत. संघटनेच्या वतीने वृक्षलागवड करण्यात आली. या सेवापूर्ती सोहळ्या निमित्ताने संघटनेचे कार्यकर्ते व उद्योजक हर्षल राऊत यांच्यावतीने उपस्थित सर्वांना सेनीटायझर वाटत करण्यात आले.
या सेवापूर्ती कार्येक्रमासाठी राहुरी नगरपालिकेच्या प्रथम नगराध्यक्षा सौ.उषाताई तनपुरे, विद्यमान नगराध्यक्ष अनिल कासार, उपनगराध्यक्ष सुर्यकांत भुजाडी, माजी उपनगराध्यक्ष दिलीप चौधरी, गाडगेमहाराज संस्थेच्या संचालीका सौ भारतीताई खांडवे,संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड, राज्य सचिव सुनिल गुलदगड, अ. नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोक तुपे, राज्य सोशल मिडीयाप्रमुख दिपक साखरे, राहुरी तालुका सचिव भरत सत्रे, वांबोरी शहराध्यक्ष सुनिल शिंदे , अजिंक्य मेहेत्रे, राहुरी कार्याध्यक्ष अक्षय गुलदगड, मीडिया प्रमुख ओकांर डागवाले, संघटक तेजस राऊत, स्वप्नील भास्कर, आनंद गोंधळे, दिपक गुलदगड, व प्रहार संघटनेचे मधुकर घाडगे यांनी परिश्रम घेतले.
यावेळी मानवाधिकार संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्ष माधुरीताई उदावंत , पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी सुर्यवंशी, आश्रम शाळेचे भानसहिवरेचे संचालक खांडवे ,संस्थेचे उंडे,दिघे, पवार, सौ व्यवहारे, ज्येष्ठ शिक्षक गुजरे आदी उपस्थित होते.