मा.केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे प्रकृती अस्वाथ्यामुळे अ.नगरच्या खासगी रुग्णालयात दाखल

मा.केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे प्रकृती अस्वाथ्यामुळे अ.नगरच्या खासगी रुग्णालयात दाखल
👉संसर्गजन्य आजाराचा धोका नको, म्हणून त्यांना कोणीही भेटू नये, डॉक्टरांची सूचना आहे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे यांना प्रकृती अस्वाथ्यामुळे अहमदनगरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती त्यांचे चिरंजीव तथा राष्ट्रवादीचे नेते ॲड प्रताप ढाकणे यांनी दिली.
ॲड प्रताप ढाकणे म्हणाले, की गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे येथे त्यांच्यावर यशस्वी सांध्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र साधारणतः १५ दिवसांपूर्वी श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
मध्यंतरी जिल्हा दौऱ्यावर असलेल्या खासदार सुप्रिया सुळे त्यांनी तसेच भगवान गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी रुग्णालयात येऊन श्री ढाकणे यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
होती. सध्या त्यांचे वय ८७ असून संसर्गजन्य आजाराचा धोका नको म्हणून त्यांना कोणीही भेटू नये, अशी सूचना डॉक्टरांनी केली आहे.
आपले वडील रुग्णालयात उपचार घेत असल्याने सध्या आपण सुरु केलेली जनसंवाद यात्रा तूर्त स्थगित केली असून या आजारातून ते लवकरच बाहेर पडतील, अशी अपेक्षा ढाकणे यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!