संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online news
अहमदनगर: श्री संत महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त माळीवाडा पंचमंडळ देवस्थान व सावता महाराज उत्सव समिती यांच्यावतीने मिरवणूक काढण्यात आली याचा शुभारंभ महंत संगमनाथ महाराज यांच्याहस्ते रथातील सावता महाराज यांच्या तैल चित्राची पूजा करून करण्यात आला.
यावेळी देवस्थानचे अध्यक्ष ॲड अभय आगरकर ,शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम ,माजी महापौर भगवान फुलसौदर ,समता परिषद अध्यक्ष दत्ता जाधव ,नगरसेवक बाळासाहेब बोराटे, मंगलताई लोखंडे, धनंजय जाधव , मनसेचे नितीन भुतारे ,उत्सव समितीचे प्रमुख छबूनाना जाधव ,पंडितराव खरपुडे, अशोकराव कानडे,पांडुरंग नन्नवरे, रंगनाथ फुलसौदर, विजय कोथिंबीरे, गजानन ससाणे, ज्ञानेश्वर रासकर, प्रा माणिकराव विधाते, नितीन पुंड, राजू फुलसौदर, सुभाष राऊत, बाबासाहेब जाधव, बाळासाहेब आगरकर, गणेश कोल्हे, राजभाऊ एकाडे, विशाल वालकर, भाऊसाहेब पुंड, अशोकराव कापरे, अनिल चेडे, पोपट शिंदे, बाळू पुंड, सोमनाथ नागापुरे आदींसह मिरवणुकीच्या अग्रभागी सनई, चोघडा, भजनी, मंडळ, टाळकरी, विणेकरी, महिला, पुरुष, युवक आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.