माजीमंत्री थोरातांच्या कट्टर समर्थकांवर लोणीमध्ये जीवघेणा हल्ला
👉जखमींमध्ये शिर्डी शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चौगुले व नगरसेवक सुरेश आरणे यांचा समावेश
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
राहाता : माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक असणारे शिर्डी शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चौगुले व नगरसेवक सुरेश आरणे या दोघांवर पक्षाच्या कार्यक्रमासाठी जात असताना लोणीमध्ये अज्ञात १० ते १२ हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला करून बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संगमनेर, राहाता, कोपरगाव तालुक्यासह जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शिर्डी शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चौगुले व नगरसेवक सुरेश आरणे ही दोघे आश्वी परिसरात माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यक्रमासाठी जात होते. या दरम्यान लोणी या ठिकाणी यांची गाडी अडवून अज्ञात १० ते १२ हल्लेखोरांनी चारचाकी वाहनातून येऊन हा हल्ला केला आहे. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रुग्णालयात जाऊन जखमी चौगुले व आरणे यांची भेट घेतली. या दोघा जखमींवर संगमनेर येथे दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती समजताच थोरात समर्थकांनी मोठी गर्दी दवाखान्यात केली होती.
नेमकी मारहाणीची घटना माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे कट्टर विरोधक मंत्री राधाकृष्ण विखे पा. हे आहेत, आणि घटनाही लोणीमध्येच घडली आहे. यामुळे या घटनेबाबत राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या मागील काळात या दोघांनी मोठे राजकीय संघटन व पक्षाची बांधणी सुरू केली होती. यामुळेच की काय या दोघांवर हल्ला झाला!, अशी चर्चा काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे.