संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- महिला आर्थिक विकास महामंडळ अंगिकृत कर्तृत्ववान लोकसंचलित साधन केंद्र अहमदनगर व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने क्रांतिज्योत सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली आहे.
या कार्यक्रम दरम्यान शासकीययोजना व कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अहमदनगर दिलासा सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी देशमुख यांनी कायदेविषक मार्गदर्शन केले तसेच महिलांविषयक चालवल्या जाणाऱ्या दिलासा विषयी माहिती दिली. महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय गर्जे यांनी महामंडळाबाबत माहिती दिली. तसेच समाजकल्याण विभागाच्या अधीक्षक सहायक आयुक्त श्रीमती लबडे एस बी यांनी समाजकल्याण योजना विषयी माहिती दिली. नगर समतादूत प्रेरणा विधाते यांनी बार्टी विषयी माहिती दिली.तसेच मावीम च्या व्यवस्थापक शामल कोचेवाड यांनी आभार मानले. सूत्रसंचालन समाजकार्य महाविद्यालयाची विद्यार्थीनी मनीषा प्रधान हिने केले. यावेळी बचतगटातील महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी आपले विचार मांडले.
मावीम तर्फे उपस्थित महिला ना कापडी पिशव्याचे वाटप करण्यात आले.व कार्यक्रमच्या शेवटी भारतीय संविधानाचे वाचन करण्यात आले.