महापालिकेची फसवणूक करणारा कचरा संकलन ठेकेदाराकडून कचरावेचकांना दमदाटी

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर –
अहमदनगर महानगरपालिकेने शहर व उपनगरात पडणारा कचरा संकलित करण्याचा ठेका ‘स्वयंभू’ पुणे या संस्थेला दिला असून या संस्थेचे चालक शहरातील कागद-काच-पत्रा वेचक कष्टकर्यांना कागद,काच,पत्रा  उचलण्यास मनाई करतात.तसेच तुमच्यावर कचरा चोरण्याचा गुन्हा दाखल करू असा दम देतात वास्तविक शहर व उपनगरात हे कष्टकरी कागद,काच,पत्रा वेचून नगर स्वच्छतेचेच काम करतात. गोळा केलेले काच, कागद, पत्रा विकून त्यावर  उदरनिर्वाह करतात. हे काम करण्यास त्यांना अडविणे म्हणजे त्यांची रोजी रोटी  हिसकावून घेणे   असल्याचे कागद-काच-पत्रा वेचक कष्टकरी पंचायत चे जिल्हा समन्वयक विकास उडाणशिवे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.

नगर शहरात सुमारे ३०० च्या आसपास कागद-काच-पत्रा वेचक असून ते मनपाचे कर्मचारी नाहीत परंतू ते शहर ,उपनगर स्वच्छतेच्या कामात मदतच करतात.शहर परिसरात कागद-काच-पत्रा गोळा करून त्यावर ते गुजराण करतात त्यांचा उदर्निर्वाह याच व्यवसायावर चालतो. वास्तविक पाहता जो कचरा महापालिकेच्या वतीने संकलित केला जातो त्याच्याशी काच-कागद-पत्रा याचा काहीही संबंध नसतो.उलट काच-कागद-पत्रा  वेचकांची एक प्रकारे कचरा संकलनात मदतच होते.शहरातील निरनिराळ्या डम्पिंग ग्राऊंडमध्ये हे सदस्य काच-कागद-पत्रा वेचकाचेचं काम करून शहर स्वच्छतेला मदतच करतात.तरीही संबंधित ठेकेदार त्यांना (कचरावेचकांना) गुन्हा दाखल करण्याचा दम देतात.त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.वास्तविक पाहता नगर शहर व उपनगरात शंभर ते सव्वाशे टन कचरा पडत असल्याचे दिसते.मात्र दररोज त्यातील ऐंशी टक्के कचऱ्याचे संकलन केले जात असल्याचे यापूर्वीच्या ठेक्यातून सिद्ध झाले असताना, ८० कचरा घंटागाड्यांमधून या कचऱ्याचे संकलन केले जाते. कचरा गोळा करून त्याचे वजन करून ठेकेदाराला ठराविक रक्कम म.न.पा कडून मिळते.हे योग्यच असून ते ठेकेदार आणि त्यांचे संबंधित एका कचरा घंटागाडीतील कचऱ्याचे वजन करून नंतर पुन्हा त्याच कचऱ्यात आणखी थोडाफार कचऱ्याची भर घालून पुन्हा त्याचे वजन करतात.अशा प्रकारे संबंधित ठेकेदाराकडून म.न.पा.ची फसवणूक सुरू आहे.  म्हणजे प्रत्यक्षात १०० ते १२५ टन कचरा शहरात व उपनगरात रोज पडत असून त्यातील ८० टक्के कचरा रोज उचलला जातो.मात्र प्रत्यक्षात २०० ते २५० टन कचरा उचलण्याचे भासविले जाते. यात म.न.पा चे मोठे आर्थिक नुकसान होते. हा प्रकार अनेक नगरसेवकांनी,पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणला असूनही त्यावर कोणतीही कारवाई होत नाही.तरी याकडे शासनाने लक्ष देऊन गरीब कचरावेचकांवर पोलीस कारवाई करण्याची धमकी देणाऱ्या ठेकेदारावरच एका कचरा घंटागाडीचे दोन वेळा वजन करून दुप्पट पैसे लावण्यावर खरंतर पोलीस कारवाई व्हावी.
अन्य महापालिकेमध्ये कचरा संकलन करणारे ठेकेदार असताना देखील काच-कागद-पत्रा वेचकांना काम करण्याची परवानगी आहे. मग अहमदनगरच्या म. न.पा.त का? नाही.त्यामुळे नगर मध्ये देखील काच-कागद-पत्रा  वेचकांना काच-कागद-पत्रा वेचण्याचे रीतसर परवानगी मिळावी अशी मागणी कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत चे जिल्हा समन्वयक विकास उडाणशिवे यांनी केली आहे.या निवेदनाच्या प्रति उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,खासदार सुजय विखे,आमदार संग्राम जगताप,जिल्हाधिकारी. डॉ राजेंद्र भोसले , मनपा आयुक्त संकर गोरे , महापौर श्रीमती रोहिणीताई शेंडगे , उपमहापौर गणेश भोसले यांना देण्यात आल्या आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!