महात्मा फुलेंची समतेची शिकवण अंगीकारणे गरजेचे-प्रतापराव ढाकणे

महात्मा फुलेंची समतेची शिकवण अंगीकारणे गरजेचे-प्रतापराव ढाकणे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी- महात्मा ज्योतिबा फुले यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात समता सेवा व न्याय चळवळ रुजवली आणि त्या माध्यमातून सामान्य व वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी तन-मन-धनाने प्रयत्न केले. फुले कुटुंब हे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील समतेला आणि समानतेला धरून चालणारे होते सर्वात आधी महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली असा महात्मा हा आजही वंदनीय आहे असे प्रतिपादन शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रतापराव ढाकणे यांनी केले.


शहरातील संत सावता महाराज मंदिरात ज्योती सूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित अभिवादन कार्यक्रमात श्री ढाकणे बोलत होते.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरुडे माजी नगरसेवक रमेश गोरे उद्योजक दत्तात्रय सोनटक्के रोहित पुंड हुमायून आता लक्ष्मणराव दोमकले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री ढाकणे म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटी शांततेच्या माध्यमातून अनेक लढाया लढले महाराष्ट्रात जेव्हा स्पुर्ष अप्रुश असे वातावरण होते तेव्हा फुले दांपत्याने या अन्यायाच्या विरोधात सामान्यांना न्याय देण्यासाठी एक चळवळ उभारली त्यातून समाजातील वंचित घटकाला न्याय मिळवून दिला महिला शिक्षणाची ज्योत त्यांनी रुजवली त्या माध्यमातून त्यावेळेसच्या व्यवस्थेचालाही याची दखल घ्यावी लागली. त्यामुळेच आज महाराष्ट्रासह देशभरात स्त्री शिक्षण महत्त्व पटले गेले. महात्मा फुले यांचे कार्य आजही अजरामर असून त्या मार्गावर चालल्यावर समता न्याय व सेवा या त्रिसूत्रीचा आधार घेतल्यास सामान्य जनतेला न्याय मिळवून देता येऊ शकतो आणि यासाठी आजच्या परिस्थितीत सामाजिक जीवनातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी मार्गक्रमण करणे आवश्यक आहे असे शेवटी प्रतापकाका ढाकणे म्हणाले.
प्रास्ताविक माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे यांनी केले. आभार बाळासाहेब सोनटक्के यांनी मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!