मला सत्तेची लालसा नाही, कुणालाही संपवून राजकारण करायचं नाही : पंकजा मुंडे

नाराज कार्यकर्त्यांशी पंकजा मुंडेंचा संवाद
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

मुंबई- भाजपाचे खासदार प्रीतम मुंडे यांना नव्याने झालेल्या मंत्रिमंडळात समावेश न केल्यामुळे नाराज होऊन राजीनामे दिलेल्या समर्थकांशी आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज मुंबईत संवाद साधला. यावेळी मी लालची नाही. मला सत्तेची लालसा नाही. मला कुणालाही राजकारण संपवून राजकारण करायचं नाही, अशा शब्दांत पंकजा मुंडे कडाडल्या. कार्यकर्त्यांच्या राजीनाम्यामुळे पंकजा मुंडे काय भूमिका घेणार याकडे भाजपासह सगळ्याचंच लक्ष लागलं होतं.
पंकजा मुंडे यांनी आज वरळीत नाराज कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करतानाच दिल्लीत नेमकं काय घडलं याचीही माहिती दिली. मी लालची नाही. मला सत्तेची लालसा नाही. मी असुरक्षित नाही. मला कुणालाही संपवून राजकारण करायचं नाही. मला दबाव तंत्र करायचं असेल तर ही ती जागा नाही. ही जागा पुरणार नाही. त्यासाठी वेगळी जागा लागेल, अशा त्या म्हणाल्या
.
भागवत कराड यांच्या मंत्रिपदाबाबत पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं. मी माझ्या समाजाच्या मंत्र्यांला अपमानित का करु? लोकांची काम करण्यासाठी मी राजकारणात आहे, असं त्या म्हणाल्या. निवडणुकीत अनेक लोक पराभूत झाले. कराड यांचं वय ६५ आहे. ते आपल्या समाजाचे आहेत मी त्यांचा अपमान करणार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!