मनी लाँड्रिंगच्या आरोपावरून एमटेक ग्रुपच्या 35 ठिकाणी छापे

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नवीदिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी (दि.20 जून) दिल्ली-एनसीआरमधील एकात्मिक घटकांचे उत्पादन करणार्‍या देशातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या एमटेक ग्रुपच्या 35 ठिकाणी छापे टाकले. 20,000 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगच्या आरोपावरून अमटेक ग्रुपवर ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने कंपनीच्या दिल्ली, गुडगाव, नोएडा, मुंबई आणि नागपूर येथील परिसरांवर छापे टाकले. एमटेक समूहाच्या प्रवर्तकांवर 20 हजार कोटी रुपयांच्या कथित बँक कर्ज फसवणुकीचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (झचङA), ईडीने एमटेक समूहाच्या गुरुग्राम, नोएडा, मुंबई आणि नागपूरसह अनेक ठिकाणी छापे टाकले. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (उइख) ने एमटेक ग्रुप कंपनीच्या एसीआयएल लिमिटेडबद्दल प्रथम माहिती अहवाल दिला होता. यानंतर संबंधित फसवणुकीची चौकशी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. ईडीने सीबीआय एफआयआरच्या आधारे आणि फसवणुकीच्या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तपास सुरू केला. त्यानंतर बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा वापर नवीन उद्योग, रिअल इस्टेट आणि परदेशी गुंतवणुकीसाठी केल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले.
शेअर्समध्ये फेरफार
माध्यमातील वृत्तानुसार, ईडीच्या तपासात समोर आले की, बनावट विक्री, भांडवली मालमत्ता, कर्जदार आणि नफा अशा प्रकारे दाखवण्यात आला की, एनटेकला एनपीए मिळू नये म्हणून ते अधिक कर्ज घेऊ शकतात. त्यामुळे सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये फेरफार झाल्याचा आरोप ईडीने केला आहे. शेल कंपन्यांच्या नावावर एक हजार कोटींची मालमत्ता जमा करण्यात आली आहे. तसेच काही परकीय मालमत्ता निर्माण झाल्या आहेत आणि पैसे अजूनही नवीन नावाने जमा आहेत, असेही ईडीने म्हटले आहे.
एमटेक ग्रुपबद्दल माहिती
एमटेक ग्रुप ही देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीचे ग्राहक जगभरात आहेत. यामध्ये क्रँक शाफ्ट, फोर्जिंग्ज, कास्टिंग ल्युमिनियम, कनेक्टिंग रॉड्स, व्हील लग्स आणि स्टीयरिंग नकल्स समाविष्ट आहेत. भारताशिवाय इतर अनेक देशांमध्येही त्याच्या कंपन्या आहेत. ज्यामध्ये ब्राझील, यूके, जर्मनी, इटली, मेक्सिको, हंगेरी आणि यूएस यांचा समावेश आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!