मनपा कर्मचारी सभासदांनी टाकलेल्या विश्वासाला पात्र राहा : आ. संग्राम जगताप

मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या नूतन संचालकांचा सत्कार संपन्न
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर  :
मनपा कर्मचारी सभासदांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता सभासदाच्या उन्नतीसाठी काम करावे. सहकार क्षेत्रामध्ये काम करीत असताना आपल्या संस्थेचा विचार करून तिला गतवैभव प्राप्त करून द्यावे. मनपा कर्मचारी पतसंस्था स्व भांडवली झाली असून सभासदाच्या भल्यासाठी काम करावे. मनपा कर्मचारी हे शहरातील नागरिकांसाठी कामाच्या माध्यमातून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहे. तरी सभासदांच्या सुंलभ सोपे व व आर्थिक फायदा होईल असे काम करावे. राज्यामध्ये मनपा सहकारी पतसंस्थेचा कारभार आपल्या कामाच्या माध्यमातून नावलौकिक मिळवून द्यावे. सभासदाच्या अडीअडचणीच्या काळात पतसंस्थेने पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सहकार पॅनलच्या सर्व नूतन संचालकांचा सत्कार करताना आमदार संग्राम जगताप समवेत संचालक बाबासाहेब मुदगल, मार्गदर्शक जितेंद्र सारसर, विजय कोतकर, अजय कांबळे, बलराज गायकवाड, विकास गीते, कैलास चावरे, सतिष ताठे, श्रीधर देशपांडे, बाळासाहेब पवार, सोमनाथ सोनवणे, गुलाब गाडे, प्रमिलाताई पवार, उषाताई वैराळ, किशोर कानडे, बाळासाहेब गंगेकर, आदी उपस्थित होते.
    संचालक बाबासाहेब मुदगल म्हणाले की सभासदांनी टाकलेल्या विश्वासाला पात्र राहून  सभासदांच्या हितासाठी काम करू पुढील पाच वर्षामध्ये कामाच्या माध्यमातून पतसंस्थेला यशाच्या शिखराकडे घेऊन जाऊ सभासदांना नवनवीन योजना आणून आर्थिक लाभ कसा होईल या दृष्टिकोनातून पावले उचलू व कर्मचाऱ्यांच्या संकट काळामध्ये पतसंस्था नेहमीच खंबीरपणे पाठीमागे उभा राहील असे ते म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!