संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- ॲम्बुलन्सचा अपघाताची घटना समजताच आपल्या सहका-यांच्या मदतीला मध्यप्रदेश घटनास्थळी दाखल होऊन महाशक्ती अँब्युलन्स ग्रुप पदाधिकारी धावून गेली. अपघातात एक मयत झाला, पण दुसरा जखमी झाल्याने त्यांच्या आर्थिक उपचार खर्चासाठी महाशक्ती अँब्युलन्स ग्रुप पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.
मध्यप्रदेशात शिवपुरी या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथील ॲम्बुलन्सचा दोन दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातामध्ये चालक अनिल बर्डे हे मयत झाले. तर राहुल गोरे हे जखमी. या अपघाताची माहिती महाशक्ती अँब्युलन्स ग्रुप पदाधिकारी समजली, त्याच क्षणी महाशक्ती अँब्युलन्स ग्रुप पदाधिका-यांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली.
अपघातातील जखमी गोरे याला अहमदनगर जिल्ह्यातील लोणी रुग्णालयात उपचारासाठी महाशक्ती अँब्युलन्स ग्रुप तातडीने आणले. त्याच्या उपचार खर्चासाठी आर्थिक मदतही मिळवून देण्यासाठी महाशक्ती अँब्युलन्स ग्रुप पदाधिका-यांचे प्रयत्न सुरू आहेत.
याबाबत महाशक्ती संस्थापक अध्यक्ष शरद कात्रजकर म्हणाले की, घटनास्थळीहून मयतास व जखमींवर उपचारासाठी लोणी येथे आणण्यासाठी रुग्ण वाहिकेची गरज होती. यावेळी लोणीचे उमर भाई यांनी महाशक्ती ग्रुपशी संपर्क करून सर्व प्रकार सांगितला महाशक्ती अँब्युलन्स ग्रुप ने त्याचवेळेस पुणे येथील ससून असोसिएशनचे अध्यक्ष व महाशक्ती पुणे जिल्हा कार्याध्यक्ष हिंगणे साहेब यांनी रणजित जानकर यांचा नंबर दिला. रणजित ला सर्व प्रकार सांगितला असता, रणजित जानकर व गोपाळ चौघुले यांनी ताबडतोब आपली अँब्युलन्स
गाडी घटनास्थळी घेऊन गेले. आपल्या महाशक्ती नगर जिल्हा सहका-यांना लोणी येथे आणण्याची जबाबदारी पार पाडली. या महत्वाच्या मदत कार्यात पुणे येथील गणेश, सागर लोखंडे, अतुल यांनी खूप मोलाची कामगिरी पार पाडली आहे. अशीच मदत एकमेकांना मिळावी, यासाठी सदैव प्रयत्न करु असे आश्वासन महाशक्ती संस्थापक अध्यक्ष शरद कात्रजकर व महाशक्ती अहमदनगर जिल्हा अध्यक्ष गौतम आढाव यांनी दिले.
Bahut achcha kaam kiya hai bhai aapne
Mai bhi ambulance wala hu maine aaj tak
Koi union Aisa kaam nahi karti tum logo ne
Ye kaam kiya hai dil khush ho gaya mai aapke
Sath me hu Nasir sayyad Borivali bhagwati
Bahut achcha laga ambulance walo ki madad
Kiya to
Sai Ambulance service pune
Sai Ambulance service pune maharashtra