… मदत करून, खोटे कागदपत्र तयार करीत शासनाची फसवणूक : महसूलच्या अधिकाऱ्यांसह ३२ जणांवर गुन्हा ; ‘नगर एसीबी’ची कारवाई

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर
: जमीन जुन्या शर्तीवर करण्यासाठी अटी व शर्तीवर परवानगी देण्यासाठी मदत करून, खोटे कागदपत्र तयार केली. जमिनीची खरेदी विक्री व्यवहार करुन दस्त नोंदणी करुन ७/१२ उता-यावर व फेरफार नोंदी घेतलेल्या आहेत व दस्त तयार करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी महसूल विभागाच्या तत्कालीन अपर जिल्हाधिकाऱ्यासह एकूण ३२ जणांविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात लोकसेवक अहमदनगर तत्कालीन तहसिलदार एल. एन. पाटील, वडगांवगुप्ता, (ता.जि.अहमदनगर) तत्कालीन तलाठी एल.एस. रोहकले, नालेगांव (ता. जि. अहमदनगर) तत्कालीन मंडळ अधिकारी दुर्गे, अहमदनगर तत्कालीन उपविभागीय अधिकारी तत्कालीन अपर जिल्हाधिकारी व्ही. टी. जरे, राजेंद्र मुठे, अहमदनगर-२ तत्कालीन सह दुय्यम निबंधक दिलीप बबन निराली व इतर ३२ आरोपी (खाजगी इसम) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या
पोलीस अधिक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर मॅडम, नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अपर पोलीस अधीक्षक माधव रेडडी व वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रविण लोखंडे यांच्या सूचनेनुसार पोनि राजु आल्हाट, पोहेकॉ संतोष शिंदे, पोकॉ. रविंद्र निमसे, पोना विजय गंगुल आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे
.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.३ जानेवारी २००६ रोजीचे पूर्वी ते दि.६ जानेवारी २००६ रोजी वडगांव गुप्ता शिवारातील गट नं.२०३ क्षेत्र २ हेक्टर ९७ आर पोट खराबा ०.०९ आर गट नं. २०५ एकूण क्षेत्र १ हेक्टर ३४ आर ही कनिष्ट महार वतन हाडोळा इनाम वर्ग ६ ची जमिन जुन्या शर्तीवर करण्यासाठी अटी व शर्तीवर तत्कालीन तहसिलदार अहमदनगर यांनी बेकायदेशीर परवानगी दिली आहे. यातील लोकसेवक तहसिलदार एल. एन. पाटील यांनी काढलेल्या आदेशास लोकसेवक वडगांवगुप्ता तत्कालीन तलाठी एल.एस. रोहकले, नालेगांव तत्कालीन मंडळ अधिकारी दुर्गे यांनी मदत केली आहे.

खरेदी विक्री व्यवहाराच्या नियमबाहय फेरफार नोंदी घेऊन खाजगी इसम उत्कर्ष पाटील व अजित कड यांना मदत केली आहे. तसेच लोकसेवक तत्कालीन अपर जिल्हाधिकारी अहमदनगर व्ही. टी. जरे व‌ तत्कालीन उपविभागीय अधिकारी नगर भाग राजेंद्र मुठे यांना आदेश बेकायदेशीर असल्याची माहिती होती. असे असताना देखील त्यांनी कुठलीही कारवाई न करता, बेकायदेशीर व्यवहारात सहभागी होऊन व्यवहारास एक प्रकारे प्रोत्साहन दिले आहे असे दिसून येत आहे. अहमदनगर-२ तत्कालीन सह दुय्यम निबंधक दिलीप बबन निराली यांनी खरेदी विक्रीचे बेकायदेशीरपणे दस्त नोंदविले आहे. तसेच जमिनीचे भोगवटादार ७) दिनकर आनंदा शिंदे, ८) विनायक शंकर शिंदे, ९)बाबु आनंदराव शिंदे, १०) मोहन आनंदराव शिंदे, ११) वामन किसन शिंदे, १२) यादव किसन शिंदे, १३) सदाशिव केशव शिंदे, १४) रामभाऊ केशव शिंदे, १५) सुनिल केशव शिंदे. १६) यादव केशव शिंदे, १७) श्रीमती मालनबाई केशव शिंदे, १८) श्रीमती लता शांतवण भाकरे, १८) अरुण दगडु शिंदे, २०)शालनबाई दगडु शिंदे, २१) लक्ष्मण रामचंद्र शिंदे, २२ ) मथुरा विष्णु शिंदे, २३) संदिप विष्णु शिंदे २४ ) सुनिता रतन गायकवाड, २५) नंदा शाम घाटविसावे, २६) शालुबाई शाहुराव प्रभुणे, २७) मच्छिंद्र आनंदाव शिंदे, २८) लिलाबाई चंद्रभान पाडळे, २९) शोभा बुध्दीराम ठाकुर, तसेच संमती देणार ३० ) वत्सलाबाई तुकाराम पाचारणे, ३१) सुशिला शांतवण घाटविसावे ३२) तुळसाबाई मारुती नरवडे, ३३)बुबाई भिवाजी साळवे, ३४) इंद्रायणी विठठल जाधव, ३५ ) वत्सला वामन जाधव, ३६) कौसल्या दामु जगताप यांचे जनरल मुखत्यार ३७) उत्कर्ष सुरेश पाटील (रा. श्रमिकनगर आनंदऋषीजी मार्ग अहमदनगर) व जमिन खरेदी करणारे ३८) अजित कचरदास लुंकड (रा. आनंद दर्शन अपार्टमेंट, मार्केटयार्ड, अहमदनगर) यांना जमीन ही महार वतन हाडोळा इनाम वर्ग ६ब ची जमिन असल्याचे माहित असून देखील त्यांनी तहसिलदार यांना जमिन जुन्या शर्तीवर करण्यासाठी अटी व शर्तीवर परवानगी देण्यासाठी मदत करून, खोटे कागदपत्र तयार करुन, जमिनीची खरेदी विक्री व्यवहार करुन दस्त नोंदणी करुन ७/१२ उता-यावर व फेरफार नोंदी घेतलेल्या आहेत व दस्त तयार करुन शासनाची फसवणुक केली आहे. सदर बाबत एम.आय.डी.सी. पो.स्टे., जि. अहमदनगर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ से कलम १३(१)(ड) सह १३(२) सह भा. दं. वि. क.१६७, ४२० १०९ प्रमाणे दि.१९ जुलै २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हूयाचा पुढील तपास अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रविण लोखंडे हे करीत आहेत.

📥📥कोणीही लोकसेवक सर्वसामान्य जनतेला त्यांच्या काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय, अहमदनगर येथे खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक प्रविण लोखड़े यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!