संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork (video news)
अहमदनगर : भाजपा अहमदनगर शहर जिल्हाध्यक्षपदी नव्याने निवड झालेले ॲड अभय आगरकर यांचा भिंगार शहर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने रविवारी सायंकाळी भिंगार मारुती मंदिर येथे भिंगार शहराध्यक्ष शिवाजीराव दहिहंडे यांच्या हस्ते फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी भाजावा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड नाईक, संतोष गांधी यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कारमूर्ती ॲड अभय आगरकर म्हणाले की, भाजपाचे संगठन वाढविण्यासाठी भर द्यावा लागेल. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या योजना सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम आपणास करायचे आहे.
भिंगार शहराध्यक्ष शिवाजीराव दहिहंडे म्हणाले की, ॲड अभय आगरकर यांच्या अहमदनगर शहर जिल्हाध्यक्षपदी निवडीमुळे शहर भाजपा कार्यकर्त्यांना द्विगुणित उर्जा मिळाली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा संगठन वाढविण्यासाठी अहोरात्र झटू, अशी ग्वाही श्री दहिहंडे यांनी यावेळी दिली. तसेच यावेळी नगरसेविक शुभांगी साठे, ॲड नाईक, तुषार पोटे आदिंची भाषणे झाली.
या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा ज्योत्स्ना मुंगी, चेतन वझगडेकर, सुरेश तनपुरे, अनंत रासने, सचिन फिरोदिया, अनंत बोथरा, सौरभ रासने, सचिन गायकवाड, संतोष हजारे, मयुर जोशी, कैलास गव्हाणे, राजु जाधव, स्वप्निल शेलार, ब्रिजेश लाड, अंबादास घडसिंग, शंकरराव बहिरट, विठ्ठल दळवी, सदाशिव नागापुरे, संतोष होने, अजय देवकुळे, कमलेश धर्माधिकारी, बाळासाहेब रासकर, बाळासाहेब शेकटकर, प्रशांत जोशी, कमलेश गांधरे आदिंसह भिंगार शहरातील भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.