भिंगार येथे बेलेश्वर कन्स्ट्रक्शनतर्फे श्रीराम कथा कार्यक्रमाचे आयोजन : महेशभाऊ झोडगे


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
भिंगार –
बेलेश्वर कन्स्ट्रक्शन व महेशभाऊ झोडगे मिञमंडळा यांच्यातर्फे श्रीराम कथा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. दि. २३ ते २९ मे २०२२ रोजी ७ दिवस सायंकाळी ६ ते ९ वाजता शुक्लेश्वर मंदिर, भिंगार येथे श्रीरामकृष्ण परमहंस सेवा प्रतिष्ठाणचे समाधानजी महाराज शर्मा यांच्या सुश्राव्य वाणीतून हा कथा कार्यक्रम होणार आहे. या कथा कार्यक्रमावेळी दररोज भाविकांना महाप्रसादचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती युवानेते बेलेश्वर कन्स्ट्रक्शनचे संचालक महेशभाऊ झोडगे यांनी दिली.


या कार्यक्रम दरम्यान महाराज रामायणाच्या कथेतील सोमवार (दि.२३) ग्रंथ महात्म्य शिवपार्वती विवाह, मंगळवार (दि.२४) श्रीराम जन्मोत्सव, बुधवार (दि.२५) सीताराम स्वयंवर, गुरुवार (दि.२६) राम वनवास आणि केवट भेट, शुक्रवार (दि.२७) भरत व राम भेट, शनिवार (दि.२८) शबरी राम मिलन हनुमान भेट, रविवार (दि.२९) युद्ध प्रसंग रावण दहन आणि श्रीराम राज्याभिषेक प्रसंगांचा उलगडा करुन भाविकांना त्याचा सार सांगणार आहेत. या श्रीराम कथा कार्यक्रमाचा भिंगारसह परिसरातील पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री झोडगे यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!