भिंगार भाजपाचे वसंतराव राठोड यांच्या गाडीची अज्ञातांकडून तोडफोड

भिंगार भाजपाचे वसंतराव राठोड यांच्या गाडीची अज्ञातांकडून तोडफोड
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहिल्यादेवीनगर : भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मानद सदस्य तथा भाजपाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारिणी सदस्य वसंतराव राठोड यांची भिंगार देशमुख मंगल कार्यालयानजिक असणा-या राधानगरी काॅलनीतील राहत्या घरासमोर उभी असलेल्या फोरव्हीलर गाडीच्या रविवारी (दि.१४एप्रिल) च्या पहाटेच्या सुमारास अज्ञातांनी काचा फोडण्याची घटना घडली आहे. याबाबत श्री राठोड यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


या घटनेचा भिंगार भाजपाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. प्राथमिक समजलेल्या माहितीवरून ही घटना विरोधी गटाकडून करण्यात आला संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे पोलिसांनी योग्य व तातडीने तपास केल्यास आरोपी सापडले जातील, असे म्हटले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच भिंगार पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची पोलिस माहिती घेत असून लवकरच आरोपींना पकडण्यात येईल, असे भिंगार पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!