संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीनंतर भिंगार येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. शुक्रवार बाजारपेठ येथे सर्व पक्षीय व सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्यांच्या उपस्थितीमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. सायंकाळी उत्साहाने मिरवणुकीत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या डिजेच्या गाण्यांवर तरूण वर्ग थिरकला. मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.