भिंगारला ‘अण्णा हजारे’च्या उपस्थितीत भाविक ‘श्री रामकथे’च्या सहाव्या दिवशी मंञमुग्ध


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर-
भिंगार-नागरदेवळे येथे महेशभाऊ झोडगे मिञमंडळीच्या वतीने शुक्लेश्र्वर मंदिराजवळ समाधानजी महाराज शर्मा यांचा सुरू असणा-या ‘श्री रामकथे’च्या ‘शबरी राम मिलन हनुमान भेट’ या सहाव्या दिवशीचा धार्मिक कार्यक्रम शनिवारी सायंकाळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आमदार निलेश लंके व युवानेते महेश झोडगे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.


दरम्यान नागरदेवळे मिञमंडळाच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते युवानेते महेश झोडगे यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात यज्ञश्वेर महाराज, आमदार निलेश लंके, माजी जि.प.सदस्य शरद झोडगे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, श्री कर्डीले, शिवसेनेचे मा.शहरप्रमुख दिलीप सातपुते, ॲड संतोष गायकवाड आदिंसह मान्यवरांचा महेशभाऊ मिञमंडळाकडून सत्कार करण्यात आला.


दरम्यान समाधानजी महाराज शर्मा यांनी ‘श्री रामकथे’च्या सहाव्या दिवशीच्या ‘शबरी राम मिलन, हनुमान भेट’ हा विषयी स्पष्ट करताना उदाहरणे देत भक्तीभाव सांगत, समाजाचे प्रबोधनाला हात घातला. यावेळी श्री रामगीत राजश्री सुभाष काकडे, मनोश्री चंद्रशेखर धाडगे या लहान मुलींनी गायले. शेवटी मान्यवरांच्या हस्ते आरती झाली. या श्री रामकथेच्या सहाव्या दिवशी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविवारी या शेवटच्या ‘श्री रामकथे’च्या दिवशी ‘युद्ध प्रसंग रावण दहन आणि श्रीराम राज्याभिषेक’ या कथेने समारोप होणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!