भिंगार-नागरदेवळे ‘श्री रामकथे’चा समोरोप


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर-
‘जय श्रीराम’ च्या जयघोषात महेशभाऊ झोडगे मिञमंडळाच्या वतीने भिंगार शुक्लेश्र्वर मंदिराशेजारी समाधान महाराज शर्मा यांच्या ‘श्री रामकथे’तील रावण दहन आणि श्रीराम राज्याभिषेक सोहळ्याने रविवार मोठ्या भक्तिभावाने समोरोप झाला.


यावेळी समाधान महाराज शर्मा हे ‘श्री रामकथे’ चा सार सांगताना ते म्हणाले की, ज्याचा हेतू चांगला असतो, त्याचा सेतू नेहमीच चांगला असतो. यामुळे सर्वात प्रथम आपल्या कुटुंबावर प्रेम करा. तत्पूर्वी श्री रामकथेच्या ७ व्या दिवशी उपस्थितीत भाविकांना भक्तीभाव कसा जोपसावा, याबाबत श्री शर्मा महाराज यांनी मंञमुग्ध वाणीतून सांगितले.
दरम्यान युवानेते महेशभाऊ झोडगे यांच्या मातोश्री लिलाबाई झोडगे यांचा समाधान महाराज शर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तर युवानेते महेशभाऊ झोडगे यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांनी केला.यावेळी श्री झोडगे यांनी आयोजित श्री रामकथे’च्या कार्यक्रमासाठी केलेल्या मदतगारांचे विशेष आभार मानले.
अंधारमय वातावरणात मेणबत्तीच्या प्रकाशात भाविकांसह युवानेते महेशभाऊ झोडगे यांनी आपल्या सर्व कुटुंबासह मोठ्या भक्तिभावाने महाआरती केली.
कार्यक्रमाप्रसंगी महेशभाऊ मिञमंडळातर्फे शुक्लेश्र्वर देवस्थानास एक लाख रुपयांची देणगी दिली. काही दिवसांपूर्वी शहीद झालेल्या जवानांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमात ‘श्री रामकथे’स माजी महापौर बाबासाहेब वाकळे, उद्योजक भाऊ बोरूडे, शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक योगिराज गाडे, विनित पाऊलबुद्धे, राहुल शेटे, बाळासाहेब पवार, निखिल वारे, रोहिदास कर्डीले, दत्ता तापकिरे, राधेश्याम मालपाणी, माजी जि.प.सदस्य शरद झोडगे, जालिंदर बोरूडे, संतोष आढाव, संजय सपकाळ, आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
👉 ‘श्री रामकथा’ कार्यक्रमात
हिंदू-मुस्लिम ऐक्य


‘श्री रामकथे’च्या सात दिवस मोठ्या भक्तिभावाने भाविकांना महाप्रसाद बनविण्याचे काम करणारे उस्मानचाचा, समीर पठाण, उस्मान सय्यद सादीक, मतीन शेख, शाहीद पठाण हशीमचाचा यांच्यासह मुस्लिम बांधवांचा समाधानजी महाराज शर्मा यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
‘श्री रामकथे’चे सात दिवसांचे कार्यक्रम यशस्वीतेसाठी राकेश ताठे, सागर निमसे, संदीप जाधव, रविशेठ फले, सचिन जाधव, संदीप धाडगे, अभिजीत पवार, अभिजीत झोडगे, ज्ञानेश्वर धोतरे, अनिकेत हजारे, दिलीप हजारे, दीपक लिपणे, सोमनाथ हराळे, संजय धाडगे, अमित झोडगे, ॠषिकेश सप्ते, अतिफ शेख, पप्पू शिंदे आदिंसह मोठ्या संख्येने स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!