👉भाजयुमोच्या जालना जिल्हा सरचिटणीस यांना मारहाण करणाऱ्या दोषीं अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबन करून कठोर कारवाई करावी- भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांची मागणी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
बीड :- भाजयुमोचे जालना जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना झालेल्या मारहाणीचा बीड जिल्हा भाजयुमोच्या वतीने निषेध व्यक्त करत, मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबन करून त्यांच्यावर कठोरपणे कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे भाजयुमोचे बीड जिल्हाध्यक्ष निळकठ चाटे व पदाधिकारी यांनी निवेदनाव्दारे मागणी केली आहे. मारहाण करणाऱ्या अधिकारी यांना तात्काळ निलंबित करून कठोर कारवाई करावी अन्यथा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी बीड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,भारतीय जनता युवा मोर्चाचे जालना जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना पोलिस प्रशासनाकडून जाणीवपुर्वक अमानुष मारहाण करण्यात आली. या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. याच धर्तीवर भारतीय जनता युवा मोर्चा बीड जिल्हाच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत. श्री. नारियलवाले यांना मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा बीड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील. तरी संबंधित अधिकाऱ्याचे निलंबन करून कठोर कारवाई करावी व भाजयुमोचे जालना जिल्हा सरचिटणीस श्री. नारियलवाले यांना न्याय द्यावा,अशी मागणी जिल्हाधिकारी बीड यांना शुक्रवार, दि.28 मे रोजी निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी निवेदन देतांना भाजयुमोचे बीड जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, जिल्हा उपाध्यक्ष संजय सानप, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष संग्राम बांगर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल वडतिले, कपिल सौदा, दत्ता परळकर, दिपक थोरात व इतर पदाधिकारी उपस्थित होते. तरी अशा निगरगट्ट पोलिस अधिकारी यांना तात्काळ निलंबित करून कठोरपणे कारवाई करण्यात यावी अन्यथा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजयुमोचे बीड जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी दिला आहे.
संकलन : महादेव गिते, बीड