भाजपात जुन्या – नव्याचा वाद चव्हाट्यावर येणार!
भाजपात नवीन आलेल्या नेत्यांकडून जुन्या भाजपा कार्यकर्त्यांची हेळसांड ; पक्षात नवीन – जुन्यांचा कार्यकर्त्यांचा वाद उफाळून येणार!
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online news Natwork
अहमदनगर : भाजपात अनेक नव्या नेत्यांनी काही महिन्यांपूर्वी प्रवेश करुन महत्त्वपूर्ण पदे किंवा मंत्रिपदे घेऊन आपल्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांना भाजपाची महत्त्वपूर्ण पदे देऊन अख्खा अहमदनगर भाजपा हायजॅक केला आहे. यामुळे पहिल्यापासून ज्यांनी भाजपाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी लढाई केली, त्यांना भाजपात नव्याने आलेल्या पाहुण्या कालाकारांनी जुन्या मुळांच्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना चार हात लांब ठेवण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे अहमदनगर जिल्ह्यात व नगर शहरात जुना भाजप गट व नवा भाजप गट असं काही ठिकाणी सोडले तर जवळजवळ सर्वच अहमदनगर जिल्ह्यात दिसून आले आहे. भाजपाची सत्ता नव्हती. त्यावेळेस भाजपाचे नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अहमदनगरच्या भाजपा पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना भेटत असतं. पण ते आत एरवी दिसत नाही. त्यात आता छोट्या समुहाचे लोक म्हणतात की, भाजपाला आता आपल्या मतांची व छोट्या लोक समुहाची गरज नाही वाटते ??, असाही सवाल उपस्थित करीत आहेत. त्याचा प्रत्यय रविवारी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकी दरम्यान भाजपातील जुना भाजपा गट आक्रमक भूमिकेत दिसून आला.
एकीकडे भाजपची उत्तर नगर जिल्ह्याची कार्यकारिणीची घोषणा अद्याप रखडलेली आहे. अशात दक्षिण नगर जिल्ह्याच्या घोषित कार्यकारिणीत शेवगाव-पाथर्डी तालुक्यांतील पदाधिकारी निवडीला आमदार मोनिका राजळे यांनी पक्षांतर्गत गटातटाच्या राजकारणात स्थगिती आणावी लागल्यामुळे मुंडे समर्थक पदाधिकाऱ्यांनी आपली नाराजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर व्यक्त केली.
मुंडे गटाचे नाराज गोकुळ दौंड, अरुण मुंडे, बाळासाहेब सोनवणे, वैद्य आदींच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी जोरदार घोषणाबाजी करत शक्तिप्रदर्शन केले. पाथर्डी-शेवगाव मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, दक्षिणेचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग आदींच्या उपस्थितीमध्ये पारनेर, राहुरी आणि शेवगाव-पाथर्डी येथील पदाधिकाऱ्यांचा मेळावा बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी ओबीसी जिल्हाध्यक्ष पदावर निवड होऊन पदाला स्थगिती मिळालेले गोकुळ दौंड यांनी आपण 30 वर्षे पक्षासाठी एकनिष्ठपणे काम केले आहे. मात्र, आमच्या जुन्या अनेक कार्यकर्त्यांच्या पदांना राजळे यांनी स्थगिती दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आज आम्ही याबद्दल प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे दाद मागितली आहे. पाहू काय निर्णय होतो. त्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असा गर्भित इशारा दौंड यांनी यावेळी दिला.