भाजपाचे रोहन शेलारांसह समर्थकांचा शरदचंद्र पवार राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्या रविवारी (दि. 5मे) ला झालेल्या प्रचारासभेप्रसंगी लोकनेते निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष तथा युवानेते अभिषेक कळमकर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे स्टारप्रचारक खा.अमोल कोल्हे व कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चाचे माजी उपशहर जिल्हाध्यक्ष, विधानसभा सुपर वॉरियर, शक्ती केंद्रप्रमुख व संघर्ष युवा मंचाचे अध्यक्ष रोहन शेलार यांनी त्यांच्या नगर शहरातील समर्थकांसह शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या गटात जाहीर प्रवेश केला.
या जाहीर प्रवेशावेळी जुबेर उर्फ बाबू कुरेशी, अजय पाटोळे, नानासाहेब घोडके, सुधाभाऊ साळवे, विकी पवार, संदीप गायकवाड, अफजल कुरेशी, आकाश कोरे, हरीश पडांगळे, वाजिद शेख, सकल्याण कुरेशी, शहेबान बागवान, रिजवान शेख, इमरान कुरेशी, बंटी शिंदे, राहील कुरेशी आदींसह मोठ्या संख्येने शहरातील भाजपाचे कार्यकर्ते उपस्थितीत होते.
यावेळी रोहन शेलार यांच्यासह त्यांच्या समर्थकांना नगर शहरात शरद पवार राष्ट्रवादीचे काम करत असताना सर्वप्रकारे मदत करण्याचे आश्‍वासन लोकनेते निलेश लंके यांनी दिले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!