भाजपाचा कार्यकर्ता भाजपावर नाराज ! अ.नगर लोकसभा मतदारसंघाचे चित्र…

भाजपाचा कार्यकर्ता भाजपावर नाराज ! अ.नगर लोकसभा मतदारसंघाचे चित्र…
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्रात अहमदनगर (अहिल्यानगर) लोकसभा मतदारसंघात बळजबरीने लादलेला उमेदवार आहे, अशी एकंदरीत अहमदनगर(अहिल्यानगर) भाजपातंर्गत जवळपास सर्वच तालुक्यातून.. विशेषात: नगर शहरातून तळागाळातून भावना व्यक्त केली जात आहे. त्यात निष्ठावंत भाजपावाल्यांना बुक्यांचा मार खात असल्याची परिस्थिती आहे. कारण भाजपाच्या वरिष्ठांनी अहमदनगर (अहिल्यानगर) मतदारसंघात दिलेल्या उमेदवाराने जवळपास एक ते दोन मतदारसंघातील भाजपाचे म्होरके सोडले, तर उर्वरितांना भाजपा निष्ठावंतांना कोठेही स्थान दिले गेले नसल्याचे चित्र आहे.

गावागावांत फक्त सरपंचकडेच भाजपा उमेदवाराचे लक्ष असल्याने उर्वरित गावातील वास्तव भाजप कार्यकर्ते दुर्लक्षित असल्याने भाजपा कार्यकर्ता हा भाजपावरच नाराज झाले आहेत. तसेच यापूर्वी मागील निवडणुकीत गावापातळीवर बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची विशेषतः डाॅ.सुजय विखे पाटील यांच्याकडून व यंत्रणेकडून अवहेलना झाली. या सगळ्या घडामोडींमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर अ.नगर (अहिल्यानगर) लोकसभा मतदारसंघात भाजपाचा कार्यकर्ता हा भाजपावरच नाराज असल्याचे चित्र आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!