बेलवंडी पोलीस ठाण्याचा विशेष कामगिरीबद्दल आयजी शेखर पाटील यांच्या हस्ते सन्मान
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्याच्या पथकांनी मुस्कान ऑपरेशन अंतर्गत विविध ठिकाणी छापे टाकून १७ वेठ बिगारी पीडितांची सुटका केल्याने नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर यांच्या हस्ते बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोनि संजय ठेंगे यांना प्रशस्तिपत्र देऊन बेलवंडी पोलीस ठाण्याच्या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद राऊत यांच्या हस्ते टी-शर्ट देऊन, पुष्पगुच्छ देऊन मिठाईवाटून सन्मान करण्यात आला.
या विशेष कारवाईत सहभागी असणारे बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोनि संजय ठेंगे व पोसई. मोहन गाजरे, सफौ.मारुती कोळपे, रावसाहेब शिंदे, पोहेकॉ. अजिनाथ खेडकर, पोहेकॉ. नंदकुमार पठारे, चापोहेकॉ. भाऊ शिंदे, पोहेकॉ हसन शेख, पोहेकॉ भाउसाहेब यमगर, पोहेकॉ झुंजार, पोहेकॉ जायकर, मपोना वलवे, मपोना काळे, मपोना अविंदा जाधव, पोना. शरद गागंर्डे, पोना.जावेद शेख, पोकॉ. विनोद पवार, पोकॉ,कैलास शिपनकर, पोकॉ. संदिप दिवटे, पोकॉ. सतिष शिंदे, पोकॉ विकास सोनवणे, मपोकॉ धावडे, अश्विनी शिंदे या सर्व पोलीस अंमलदारांचे ही अभिनंदन करून कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.
वेठ बिगारीतून मुक्त करण्यात आलेल्या इसमांचा सांभाळ करून त्यांच्यावर उपचार करणाऱ्या व त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी कार्यरत असणाऱ्या मानव सेवा प्रकल्प या संस्थेचे गुंजाळ, सिराज शेख यांचाही नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी.जी शेखर पाटील व पोलीस अधीक्षक राकेश ओला त्यांचा सन्मान केला.