बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत अ.नगरच्या ‘यश शाह’ने‌ १७ व १९ वयोगटाच्या एकेरी, दुहेरीचे विजेतेपद पटकावले

👉बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवरील विविध गटातील बॅडमिंटन स्पर्धेत त्याने प्राविण्य मिळवले आहे.
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पुणे :
अहमदनगरच्या यश शाह याने नुकत्याच पुणे येथील मॉडर्न कॉम्प्लेक्स येथे दि.१४ ते १८ जुलै रोजी झालेल्या योनेक्स-सनराईज प्रायोजित पुणे जिल्हा सिनियर गटाच्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पुणे जिल्ह्याचे एकेरीचे उपविजेतेपद तर दुहेरीचे विजेतेपद नरेंद्र गोगावले या खेळाडूच्या साथीने पटकावले.

यश शाह हा पुणे जिल्हा मेट्रो.पो.बॅडमिंटन असो.चा नोंदणीकृत खेळाडू आहे. स्पर्धेत पुण्यातील २७५ खेळाडूंचा सहभाग होता. विशेष म्हणजे यशला या स्पर्धेमध्ये कोणतेही मानांकन न्हवते तरी त्याने या स्पर्धेततील दुसऱ्या व तिसऱ्या मानांकीत खेळाडूंवर सरळ सेटमध्ये मात करत ऐकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. यश शाह हा पुणे येथे गेल्या चार वर्षांपासून कोच चैतन्य नाईक संचालित चैतन्य नाईक बॅडमिंटन अकॅडमीमध्ये सराव करत असून फिटनेसचे ट्रेंनिंग कोच मिहीर तेहरणीकर याच्याकडे घेतो. या अगोदर राज्याचे १७ व १९ वयोगटाचे एकेरीचे व दुहेरीचे विजेतेपद ही यशने मिळवले. राष्ट्रीय पातळीवरील विविध गटातील बॅडमिंटन स्पर्धेत त्याने प्राविण्य मिळवले आहे. अ. भा. पातळीवरील खेलो-इंडिया आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी यशची या अगोदर दोनदा निवड झाली आहे. मागील वर्षी नागपूर येथे झालेल्या आंतराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात यशला सहभागी होण्याची संधी मिळाली होती. त्याच्या या यशाबद्धल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. यशच्या पुढील प्रवासासाठी वाडियापार्क बॅडमिंटन मॉर्निंग व इव्हीनिंग ग्रुपचे सदस्य, पदमश्री पोपटराव पवार, खा. सुजय विखे पा, आ. संग्राम जगताप, उद्योजक नरेंद्र फिरोदिया.जि बॅडमिंटन असो.चे अध्यक्ष ॲड. अशोक कोठारी, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिल्ले आदीनी अभिनंदन केले आहे.

पुणे येथे संपन्न झालेल्या सिनियर गटाच्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दुहेरीचा पुणे जिल्ह्याचा बॅडमिंटन अजिक्यपदाचा मानाचा करंडक प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वीकारताना नरेंद्र गोगावले व यश शाह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!