👉अंधारामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर : बालिकाश्रम रोड व परिसर हा नगर शहराचा मुख्य भाग आहे. मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती निर्माण झाल्या असून दाट लोकवस्ती आहे. या भागातून मोठी रहदारी व वाहतूक होत आहे. याबरोबर शालेय विद्यार्थ्यांचे क्लास, वस्तीग्रह व कॉलेज या भागामध्ये आहे. या परिसरामध्ये अनेक दिवसांपासून पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांना अंधाराला सामोरे जावे लागते. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यां निर्माण झाले आहे. मनपाच्यावतीने तातडीने ६० व्हॅटच्या स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्याची मागणी मनपा महिला बालकल्याण समितीचे सभापती पुष्पाताई बोरुडे यांनी महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
बालिकाश्रम रोडवर व परिसरामध्ये नागरिक पहाटे व सायंकाळी जॉगिंग करत असतात. या परिसरामध्ये अंधार असल्यामुळे रात्रीच्या वेळी भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. याच बरोबर यापूर्वी रोडवर महिलांचे दागिने ओरबाडून नेण्याच्या घटना घडल्या आहेत. बालिकाश्रम रोडवर अंधार असल्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. या भागातील नागरिकांनी वेळोवेळी पथदिवे बसवण्याची मागणी माझ्याकडे केली आहे. तरीही महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता नवीन एलईडी पथदिवे बसविण्याच्या काम ठेकेदारामार्फत सुरू असून ६० वॅटचे स्मार्ट एलईडी पथदिवे बालिकाश्रम रोड व परिसरामध्ये तात्काळ बसविण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.