संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नगर : चिचोंडी पाटील येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश महादेव जाधव यांची ओबीसी बाराबलुतेदार महासंघाच्या नगर तालुकाध्यक्षपदी तर,सरचिटणीस पदी दिपक बाळासाहेब कांबळे यांची नियुक्ती झाली आहे. जिल्हाध्यक्ष माउली मामा गायकवाड यांनी श्री.जाधव व श्री कांबळे यांच्यावर तालुक्यात ओबीसी बाराबलुतेदारांचे संघटन वाढवण्याचे जबाबदारी दिली आहे.महासंघाचे पाईपलाईन रस्ता येथील संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत श्री.गायकवाड यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी श्री.गायकवाड म्हणाले,उपेक्षित,गरजू,निराधारांना प्रथम न्याय देत समाजकारण करावे.सहकारी,पदाधिकारी आणि बाराबलुतेदार यांचे सहकार्य मिळवत महासंघाचे संघटन मजबूत केले पाहिजे.आज आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. राजकीय,सामाजिक क्षेत्रात आज ओबीसी बाराबलुतेदार पुढे येत आहेत हि महासंघाच्या प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या गेल्या अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि इतर मागासवर्गीय राजकीय नेत्यांचेहि योगदान त्यात आहे. असेही त्यांनी सांगितले. तर जिल्हा उपाध्यक्ष अनिल इवळे यांनी तालुक्यातील वाडीवस्ती पर्यंत महासंघाचे संघटन करून ओबीसी बाराबलुतेदारातील विविध समाजाला प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी प्रयत्न करतांना या समाजाचे प्रश्नही संबंधितांकडे मांडले पाहिजेत असे सांगितले.
तालुक्यातील सहकाऱ्यांना बरोबर घेऊन कार्यकारिणी करून महासंघाचे मजबूत संघटन करून आणि समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न,पाठपुरावा करू असे आश्वासन नियुक्तीपत्र स्वीकारतांना तालुकाध्यक्ष श्री.जाधव व सरचिटणीस श्री.कांबळे यांनी दिले. यावेळी नवोदित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. शहराध्यक्ष शामराव औटी, तालुक्यातील गणेश गोसावी, महेश वाटाडे, दिपक चौधरी,शहर उपाध्यक्ष संदीप सोनावणे, शहर सचिव सागर नांदुरकर, आदिनाथ गायकवाड, मल्हारी गीते, आदी उपस्थित होते. शेवटी राजेश सटाणकर यांनी आभार मानले.