देशात कोरोनाला थोपविण्यासाठी लसीकरण वेगाने केले जात आहे. आतापार्यंत देशभरात २० कोटींहून अधिक जणांची लसीकरण पार पडले आहे. सध्या देशात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस दिली जात आहे. पण या वर्षात अनेक लसी देशातील कोरोना लढाईत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. दरम्यान आता अमेरिकन फार्मा कंपनी फायझर काही अटीशर्थीनुसार यावर्षी भारताला ५ कोटी लसीचे देण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.
फायझर कंपनीला डोस देण्याच्या बदल्यात नुकसान भरपाईसोबतच महत्त्वपूर्ण नियामक सूट हवी आहे. यादरम्यान अजून एक अमेरिकन फार्मा कंपनी मॉडर्ना देखील मुंबई स्थित असलेली औषध कंपनी सिप्लाच्या संपर्कात असून आपल्या कंपनीचे डोसेसचे उत्पादन भारतात सुरू करू शकते.
यापूर्वी दोन्ही औषध निर्माता कंपन्यांनी दिल्ली आणि पंजाब राज्य सरकारला लसीचे डोस देण्यास नकार दिला होता. फक्त केंद्र सरकारसोबत व्यवहार करू, असा दावा कंपनीने केला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोमवारी म्हणाले की, कोरोना लसीसाठी आम्ही फायझर आणि मॉडर्ना कंपनीसोबत बातचित केली. परंतु दोन्ही कंपन्यांनी लसीचे डोस देण्यास नकार दिला आहे. ते म्हणाले की, फक्त भारत सरकारसोबत व्यवहार करू.दरम्यान देशात आता रशियन बनावटीच्या स्पुटनिक व्ही लसीच्या उत्पादनास सुरुवात झाली आहे. एएनआयच्या माहितीनुसार, भारत आणि रशिया दर महिन्याला सुमारे ३५ ते ४० मिलियन डोस तयार करण्याची योजना करत आहे, जी ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये सुरू होईल.