प्रियंका भोर यांना अ.नगर जि.प. तर्फे दिला जाणारा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर

2 जुलै रोजी होणार वितरण

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर
: नगर तालुक्यातील कर्जुने खारे येथील तात्कालीन ग्रामसेविका प्रियंका भोर यांना जि. प. अहमदनगर यांच्या वतीने देण्यात येणारा सन 2021-22 चा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार नुकताच जाहीर झाला असून त्याचे वितरण 2 जुलै रोजी होणार आहे.

श्रीमती प्रियंका भोर यांनी कर्जुने खारे येथे आदिवासी समुदायातील नागरिकांना हक्काचा पक्का निवारा मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा शेवटच्या घटकांपर्यंत योग्य पद्धतीने लाभ मिळावा यासाठी प्रभावी अंमलबजावणी केली. ‘शबरी नगर गृह संकुल’ प्रकल्पाची राज्य शासनाने देखील दखल घेतली असून महाआवास अभियान 2020-21 अंतर्गत सदर प्रकल्पास राज्य शासनाचा वतीने सर्व उत्कृष्ट गृह संकुल प्रकरात राज्यात प्रथम क्रमांक मिळाला असून त्यानी सर्व शासकीय योजनांचा कृतिसंगम करून जिल्हा परिषदेची मान उंचावली आहे. यापूर्वी श्रीम. भोर यांना सहकार मंत्री अतुलजी सावे यांचा हस्ते राजश्री शाहू ग्रामरत्न पुरस्काराने व पंचायत समिती, नगर यांच्याकडून आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेने २०१८-१९, २०१९-२०, २०२०-२१आणि २१-२२ या चार वर्षीच्या पुरस्कारासाठी पुरस्कारार्थीची निवड जाहीर केली आहे. प्रत्येक वर्षासाठी प्रत्येक तालुक्यातून एक ग्रामसेकाची निवड करण्यात येते. श्रीमती भोर यांच्यासह इतर ग्रामसेवकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रविवारी (दि. २ जुलै) बंधन लॉन येथे सकाळी ११ वाजता पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी समर्थ शेवाळे यांनी पत्रकाचा माध्यमातून दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!