संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : प्रा.संदीप आप्पासाहेब हापसे यांना औषध निर्माण शास्त्र या विषयातील डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली आहे.
डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फार्मसी कॉलेज अहमदनगर येथील सहाय्यक प्राध्यापक संदीप आप्पासाहेब हापसे यांना भगवंत विश्वविद्यालय विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. प्रवरा मेडिकल ट्रस्ट औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र लावरे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. प्रा. संदीप आप्पासाहेब हापसे हे विखे पाटील औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय येथे सहाय्यक प्राध्यापक या पदावर मागील 13 वर्षापासून कार्यरत आहेत. तसेच आतापर्यंत 30 पेक्षा जास्त शोधनिबंध, 3 पुस्तके आणि 1 पेटंट त्यांच्या नावावर प्रकाशित झालेले आहे. डॉक्टर हापसे यांच्या या यशाबद्दल त्यांचे बानेश्वर माध्यमिक व उच्च महाविद्यालयाचे प्राचार्य श्री काशिनाथ मारुती हापसे सर व सहकारी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
![](http://sangramsattacha.com/wp-content/uploads/2023/07/20230721_135357-1.gif)