प्राचार्य रवींद्र पटेकर आज सेवानिवृत्त

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

अहमदनगर : दादासाहेब रुपवते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रवींद्र पटेकर हे 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज (ता.31) सेवानिवृत्त होत आहे. गुगल मीट या सोशल मीडियावर दुपारी 3 ते 5 यावेळेत सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती जिल्हा मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद मेढे यांनी दिली.
बहुजन शिक्षण संघाचे कार्यकारी विश्‍वस्त अॅड. संघराज रूपवते या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. संघाचे अध्यक्ष बी.आर. कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शिक्षक संघटनेचे नेते प्रा.डॉ. सुधाकर शेलार व प्रा. विलास साठे हे प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत.पटेकर यांनी वडाळा बहिरोबा (ता. नेवासे) येथील ओ.पी.एम. बेसिक पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण म्हणून नोकरीस प्रारंभ केला. विद्यार्थी घडविण्यासाठी त्यांची तळमळ आणि शिकविण्याची हातोटी पाहून बहुजन शिक्षण संघाने त्यांना शिक्षक म्हणून नियुक्‍ती केली. सिद्धार्थ विद्यालय (संगमनेर), सजनाबाई भंडारी विद्यालय (पुणे), महात्मा फुले विद्यालय (घुलेवाडी, संगमनेर), त्यानंतर नगरला दादासाहेब रुपवते विद्यालयात प्राचार्य म्हणून उल्लेखनीय काम केले. मागासवर्गीय, ओबीसी, अल्पसंख्यांक शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे दहा वर्ष अध्यक्ष म्हणून काम केले. शिक्षकांच्या विविध प्रश्‍नांवर आंदोलने, न्यायलयीन लढाईच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून दिला. नाशिक पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून विधान परिषदेची निवडणूक ही त्यांनी लढविली होती. नाशिक महसूल विभागातील सर्व जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना त्यांचा मोठा आधार होता.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!