प्रशिक्षणार्थ ‘बीडीओ’ शितल खिंडे यांना प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर पाथर्डीतच नियुक्ती द्यावी ; मंञालय ग्रामविकास विभागाकडे प्रा.पाखरे यांची मागणी

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

मुंबई- अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीपंचायत समिती येथील प्रशिक्षणार्थ गटविकास अधिकारी शितल अनिता राम खिंडे यांना प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर पाथर्डी याच ठिकाणी पुढील कालखंडासाठी नियुक्ती द्यावी, अशी मागणी ग्रामविकास विभाग मंत्रालयाचे अवर सचिव यांच्याकडे प्रा. सुनील पाखरे यांनी नुकतीच केली आहे.
श्री पाखरे यांनी मागणी निवेदनात म्हटले की, पंचायत समिती (पाथर्डी जि. अहमदनगर) येथे दि.४ जानेवारी २०२१ पासून प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी म्हणून कु. शितल अनिता राम खिंडे यांची शासनामार्फत नियुक्ती झालेली आहे. यांच्या प्रशिक्षणाचा कालावधीची मुदत थोड्याच दिवसात संपणार आहे. त्या प्रशिक्षणार्थी काम करत असताना त्यांनी पंचायत समिती प्रशासनाचा कारभार गतिमान लोकाभिमुख व पारदर्शक केलेला आहे. त्यामुळे पाथर्डी पंचायत समितीचा गटविकास अधिकारी हा पूर्ण कलखंडासाठी नियुक्त असावा.
गटविकास अधिकारी ह्या काम करत असताना त्यांनी पाथर्डी पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या सर्व विभागाच्या कामाला विशेष प्राधान्य देत अनेक प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावले. पंचायत समितीच्या असणाऱ्या विविध विभागाच्या असणाऱ्या लोकहितवादी योजना सर्वांसाठी खुल्या केल्या व त्याचा लाभ हजारो नागरिकांना झाला तसेच कोरोना सारख्या महा मारीला सामोरे जाताना आरोग्य व ग्रामविकास व शिक्षण विभागाच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी केली लोकसहभागातून मार्गदर्शन करत कोविड सेंटर उभारण्यासाठी विशेष पुढाकार घेतला त्यामुळे दुर्गम व डोंगरी, ऊसतोडणी कामगार असलेल्या या तालुक्याला या संकटापासून व जीवनमान देण्याच काम कर्तव्यदक्ष सक्षम व सर्व स्तराचे ज्ञान असणाऱ्या या आधिकाऱ्याने केलेले आहे त्यामुळे त्यांचे कार्य हे निश्चित पणे येणाऱ्या कालखंडासाठी लोक हितवादी व ग्राम विकास विभागाचा नावलौकिक वाढविणारे आहे.
पाथर्डी जि. अहमदनगर पंचायत समितीची गटविकास अधिकारी या पदाची पार्श्वभूमी पाहता अनेक प्रभारी अधिकाऱ्यांना नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, पूर्ण वेळ कालावधी असणारा गट विकास अधिकारी मागील दशकात लाभलेला नाही त्यामुळे पाथर्डी पंचायत समितीची येणाऱ्या कालखंडात दिशा ठरविण्यासाठी व समदृष्टी ठेवून काम करणाऱ्या लोकांच्या समस्या सोडविणाऱ्या प्रशासकीय सहकार्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांची गरज आहे. सदर बाबिस प्रशि्षणार्थीं गट विकास अधिकारी पात्र आहेत. व्यक्ती नसून पाथर्डी पंचायत समितीच्या कार्यपद्धतीच्या व्यवस्थेसाठी वरील निवेदनाचा आपण राज्याचा ग्रामविकास विभागाचा मुख्य प्रशासन या नात्याने दखल घेऊन पाथर्डी पंचायत समिती याच ठिकाणी शितल खिंडे नियुक्ती देण्याचे आपल्या स्तरावरून आदेश करावेत, असे म्हटले आहे. याबाबतच्या निवेदन प्रती अहमदनगर जिल्हाधिकारी , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पाथर्डी गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना पाठविण्यात आल्या आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!