प्रभाग क्र. 7 मधील प्रलंबित कामे पूर्ण : नगरसेवक अशोकराव बडे

👉मनपा आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर

अहमदनगर- पाठपुराव्यानंतर प्रभाग क्र. 7 मधील प्रलंबित कामे पूर्ण करु असे आश्वासन मनपा आयुक्तांनी दिले होते. ती प्रलंबित कामे मार्गी लावण्यात आली असल्याची माहिती नगरसेवक अशोकराव बडे यांनी सांगितले.

श्री बडे पुढे म्हणाले की, नागापूर येथील काकासाहेब म्हस्के कॉलेज समोरील आरोग्य केंद्रापासून ते आंबेडकर चौकापर्यंत ड्रेनेज लाइन चोकअप असल्याने त्याठिकाणी नवीन 600 चे पाइप टाकून तेथील प्रश्न सोडविण्यात आला. तसेच सुभद्रा हॉस्पिटल ते गणपती मंदिर रोडवरील खूप मोठा खड्डा पडला होता, चैतन्य हॉटेल ते गांधीनगर रस्त्यावरील खड्डे, आंबेडकर चौक ते गणेश चौक रस्त्यावरील खड्डे, मनपा आरोग्यकेंद्रासमोरील खड्ड्यात खडी व मुरूम टाकून पॅचिंग करण्यात आले, तरी समस्याबाबत नगरसेवक अशोकराव बडे यांनी मनपा आयुक्त यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून तसेच आयुक्तांना समक्ष पाहणी करण्यासाठी बोलावण्यात आले. त्यांनी सर्व कामे तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते, ते आज पूर्ण करण्यात आले, असल्याचे ते म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!