प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृष्यप्रणालीद्वारे लाभार्थ्याशी साधणार संवाद ! ; अहमदनगर येथे केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा. सहभागी होणार

सामाजिक न्याय विभागाच्या लाभार्थ्यांना विविध लाभांचे उद्या वितरण
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृष्यप्रणालीद्वारे लाभार्थ्याशी साधणार संवाद ! ; अहमदनगर येथे केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सहभागी होणार
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या लाभार्थ्यांना आज अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विविध लाभांचे वितरण करण्यात येणार आहे.या कार्यक्रमात सहभागी लाभार्थ्यांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील, महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते १३ मार्च रोजी दुपारी २ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी दिली आहे.


राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ (NBCFDC), राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (NSFDC) आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ (NSKFDC) या तीन राष्ट्रीय महामंडळामार्फत भारतातील सर्व राज्यातील अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग व सफाई कर्मचाऱ्यांपैकी एक लाख लाभार्थ्यांना सवलतीचे कर्ज वाटप करण्यात येणार आहे. सीव्हर आणि सेफ्टीक टँक कामगारांसाठी आयुष्यमान हेल्थकार्ड व पी.पी.ई. साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी SU-RAJ या राष्ट्रीय पोर्टलचे अनावरण होणार आहे.
या कार्यक्रमास जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी सहभागी व्हावे. असे आवाहन श्री.देवढे यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!