- प्रदूषणामुळे घसा दुखत असेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय
sangramsattacha.com
Online Natwork
सध्या प्रदुषणाचा स्तर वाढत चालल्याने आरोग्यासंबंधित समस्या वाढू लागल्या आहेत. त्याचसोबत प्रदुषित वातावरणात श्वास घेणे सुद्धा मुश्किल होत आहे. यामुळे विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. जसे की, घसा दुखणे, डोळे चुरचुरणे, त्वचेसंबंधित समस्यांचा सामना करावा लागतो.
सर्वाधिक त्रास हा घसा दुखणे आणि घसा खवखवण्याचा होतो. घसा खवखवत असेल तर आवाज बदलणे, ताप येणे, डोके दुखणे अशी लक्षणे दिसून येऊ शकतात. जर तुम्हाला सुद्धा ही समस्या येत असेल तर काही घरगुती उपाय करू शकता.
गरम हर्बल चहा तुमच्या गळ्याची खवखव कमी करू शकते. केमोमाइल, आलं, पेपरमिंट किंवा लिकोरिस रूट सारखी हार्बल चहा पिऊ शकता. ही चहा केवळ गरमच नव्हे तर घश्याला आलेली सूज कमी करू शकते. यामध्ये अँन्टी इंफ्लेमेंटरी गुण असतात.
घसा दुखीपासून दूर राहण्यासाठी तुम्ही गरम पाणी, लिंबू, मधाचा वापर करू शकता. मधात नॅच्युरल अँन्टीबॅक्टेरियल गुण असतात. जे घसा दुखीपासून तुम्हाला दूर ठेवतात.
घसा खवखवण्याच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी गरम सूप प्या. यामुळे घश्याला आराम मिळू शकतो. पाण्याची कमतरता पूर्ण होऊ शकते. सूप प्यायल्याने तुम्हाला आजाराशी लढण्यासाठी आवश्यक असणारे पोषक तत्त्वे मिळतात.
हळदी सूज कमी करण्याचे गुण असातात. त्यामुळे घसा दुखत असेल तर गरम दूधात हळद टाकून तुम्ही पिऊ शकता. यावेळी काळी मिर्ची आणि मधही मिक्स करू शकता.