संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर -मोक्कातंर्गत गुन्ह्यात जामीनावर बाहेर आलेल्या आरोपीने पोलीस सांगून दरोडा घालणारी टोळी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. तोफीक सत्तर शेख (वय ३५ रा . काझीबाबारोड, वॉर्ड नं. २ श्रीरामपूर), साजिद खालीद मलीक उर्फ मुनचुन (रा. पापाजलाल रोड, वार्ड नं . २ श्रीरामपूर ), जावेद मुक्तार कुरेशी ( बजरंगचौक , श्रीरामपुर), शाम भाऊराव सांळुके (वय २० रा. खटकळी, बेलापुर ता. श्रीरामपूर), आरबाज जाकीर मन्सुरी उर्फ पिंजारी (वय १९ रा . कुरेशी मोहल्ला, सुभेदारवस्ती जवळ , श्रीरामपूर) अशी पकडण्यात आलेल्याची नावे आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.२७ मे २०२१ रोजी सकाळी ६ वा . सुमारे ताब्यातील अशोक लेलंड कंपनीचे दोस्त मॉडेलची गाडी (एमएच ४२, एम ९४८२) ही मध्ये ४,९१,३२८ रु . किमतीचे भंगार त्यात पितळ, तांबे, अॅल्युमिनीयम व स्टील असे नगर येथे घेऊन जात असतांना शनिशिंगणापूर फाटयाजवळ त्यांना एक पांढऱ्या इर्टीका गाडी मधून ४ इमस येऊन त्यांनी आडवून ‘आम्ही पोलीस आहोत’ अशी बातावणी करुन शिवीगाळ, दमदाटी करुन मारहाण केली. बळजबरीने त्यांचेकडील इर्टीका गाडीत बसवून त्यांचे अपहरण करुन त्यांना पुढे वरवंडी गावाचे शिवारात आडरानात नेवून सोडून दिले. गाडी भंगारसह घेऊन गेले आहेत, या चालक श्रीधर जंगलू सोनवणे (रा.लजपतरायवाडी, एकलहरे, ता. श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात गु.र.नं. १४१३/२०२१ भादवी कलम ३२७,३६३,१८०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाखल गुन्ह्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल कटके यांनी गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना दिल्या. पथक गुन्हा दाखल झाला पासुन दिवस-रात्र तांत्रिक विश्लेषानाचे आधारे व गुप्त बातमीदाराचे मार्फतीने सदर आरोपीच्या शोधात असतांना पोहेकॉ मनोज गोसावी यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली. सदरचा गुन्हा हा सराईत गुन्हेगार तसेच मोक्का गुन्हयात जामीनावर मुक्त असलेला तोफीक सत्तर शेख याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली. त्यानुसार पो.नि. श्री. कटके यांनी पथकाला सूचना दिल्या. पथकाने श्रीरामपुर येथे जाऊन तोफीक सत्तर शेख यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेऊन गुन्हयाबाबत चौकशी करता त्याने गुन्हा हा त्याचे साथीदार साजिद खालीद मलीक उर्फ मुनचुन (रा.पापाजलाल रोड , वार्ड नं . २ श्रीरामपुर), जावेद मुक्तार कुरेशी (बजरंगचौक , श्रीरामपुर), युसुफ उर्फ सोनु आजम शेख (रा.लक्ष्मीनगर , कोपरगाव), शोएब फकिरा कुरेशी उर्फ वैजापुरवाले (रा. श्रीरामपुर) यांचेसह मिळून केला असल्याची कबुली दिली. यानंतर साजिद खालीद मलीक उर्फ मुनचुन, जावेद मुक्तार कुरेशी हे मिळून आल्याने त्यांना श्रीरामपुर मधील वेगवेगळया ठिकाणाहुन ताब्यता घेतले. तसेच फरार असणारे आरोपी युसुफ उर्फ सोनु आजम शेख (रा . लक्ष्मीनगर , कोपरगाव) व शोएब फकिरा कुरेशी उर्फ वैजापुरवाले (रा . श्रीरामपुर) यांचा त्यांचे राहते घरी जावुन शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत.
दरम्यान, ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे गुन्हयातील चोरीस गेलेल्या मुद्देमाला बाबत विचारपुस करता त्यांनी सदरचा मुद्देमाल हा रामगड (ता.श्रीरामपूर) येथील आयशा टेर्डस , नावाचे भंगारवाला आरबाज मन्सुरी उर्फ पिंजारी यास विकेलेला आहे असे सांगितले. या माहितीवरून पथकाने सदर ठिकाणी जावुन आरोपी आरबाज जाकीर मन्सुरी उर्फ पिंजारी (वय १९ रा. कुरेशी मोहल्ला , सुभेदारवस्ती जवळ , श्रीरामपूर ता. श्रीरामपूर, जि.अहमदनगर) यास ताब्यात घेऊन गुन्हयातील चोरीस गेले मालापैकी ५ हजार ९२० रु . किमतीचे १४८ किलो स्टील ( भंगार ) हे आरोपीने काढून दिल्याने ते दोन पंचासमक्ष जप्त करण्यात आले. आरोपी तोफीक शेख, जावेद कुरेशी यांना गुन्हा करतांना त्यांनी आणखी कोणी साथीदार आहे काय, असे विश्वासात घेऊन विचारपुस केली असता, त्यांनी सदर गुन्हयाचे फिर्यादी यांची गाडी भरुन निघाले बाबतची माहिती ही बेलापूर येथील साथीदार शाम सांळुके याने दिल्याचे सांगीतले. आरोपी शाम भाऊराव सांळुके (वय २० रा. खटकळी, बेलापुर ता.श्रीरामपूर जि.अ.नगर) यास ताब्यात घेतले आहे . आरोपी तोफीक सत्तर शेख, साजिद खालीद मलीक उर्फ मुनचुन हे मोक्का गुन्हयात सध्या जामीनावर मुक्त आहेत.
आरोपी तोफीक सत्तर शेख याचेवर लोणी,
श्रीरामपूर शहर, कोपरगाव तालुका, रांजणगाव (जि.पुणे), तर आरोपी साजिद खालीद मलीक उर्फ मुनचुन याचेवर लोणी, श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
आरोपी तोफीक सत्तर शेख, साजिद खालीद मलीक उर्फ मुनचुन, जावेद मुक्तार कुरेशी, शाम भाऊराव सांळुके, आरबाज जाकीर मन्सुरी उर्फ पिंजारी यांना मुद्देमालासह राहुरी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अपर पोलिस अधीक्षक दिपाली काळे, श्रीरामपूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पो.नि.श्री कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि सोमनाथ दिवटे, पोसई गणेश इंगळे, पोहेकॉ मनोज गोसावी, पोना सुरेश माळी, पोना विशाल दळवी, पोना दिपक शिंदे, पोना शंकर चौधरी, पोकाँ सागर ससाणे, पोकॉ आकाश काळे, पोकॉ जालिंदर माने व चापोहेकॉ उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.