पोलिस हवालदार संदीप पवार यांना ‘मॅन ऑफ द ऑपरेशन’ हा किताब


👉पोलिस अधीक्षकांच्या हस्ते विशेष कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर
– जिल्ह्यामध्ये विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्ह्यात पाहिजे असलेले, फरार व पॅरोलवरील आरोपी मोठ्या प्रमाणावर फरार होते. अशा चार हजार ४४४ आरोपींची यादी करण्यात आली होती. त्यातील एक हजार १९८ आरोपींना विशेष मोहिमेअंतर्गत जेरबंद करण्यात आले होते.पोलिस हवालदार संदीप पवार यांनी या मोहिमेत सहभागी होऊन कौशल्यपूर्वक अति उत्कृष्ट कामगिरी करून एकूण ४४ आरोपींना पकडून प्रथम क्रमांक मिळवला. त्याबद्द्ल ‘मॅन ऑफ द ऑपरेशन’ हा किताब देऊन पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सन्मानित केले.


जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके व कर्मचारी यांचा विशेष कामगिरीबद्दल’सन्मान’करण्यात आला. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर उपस्थित होत्या.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये विविध गुन्ह्यात फरार असलेले पाहिजे (वॉन्टेड ) असलेल्या ३५८ आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाला यश आले होते.या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश इंगळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे व उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्या नेतृत्वाखाली चार पथकांनी ही कारवाई केली होती.
पोलिस हवालदार संदीप पवार ४४, पोलिस नाईक लक्ष्मण खोकले ४३, सहाय्यक उपनिरीक्षक भाऊसाहेब काळे १२, पोलिस नाईक रविकिरण सोनटक्के १० आरोपींना वैयक्तिक कामगिरी करत अटक केली .
पोलिस हवालदार सुनील चव्हाण यांनी गंभीर गुन्ह्याचा तपास कामी अत्यंत कुशलतेने व गोपनीय माहिती काढून जिल्ह्यातील गंभीर व महत्त्वाचे गुन्हयातील आरोपीस अटक करून उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे सुनिल चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला.
पोलिस नाईक शंकर चौधरी, पोलिस नाईक दीपक शिंदे, पोलिस अंमलदार शिवाजी ढाकणे, संदीप दरंदले, विश्वास बेरड यांना ही विशेष सन्मानित करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!