संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी- पत्रकार दिनानिमित्त पाथर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो तसेच सामाजिक व राजकीय परिवर्तन करण्याची धमक पत्रकारितेत असते अशी भावना सर्वांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रतापकाका ढाकणे होते. दैनिक दिव्यमराठीचे संपादक अनिरुद्ध देवचक्के यांनी सर्व पत्रकारांना मार्गदर्शन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, नगरसेवक बंडू पाटील बोरुडे, चांद मण्यार, डॉ राजेंद्र खेडकर, किरण खेडकर, महारुद्र कीर्तने, पाथर्डी प्रेस क्लबचे अध्यक्ष उमेश मोरगावकर, शेवगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष कैलास बुधवंत, ज्येष्ठ पत्रकार शर्मा, बिहाणी काका, पुरोहित काका तसेच शेवगाव पाथर्डीतील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया पत्रकार उपस्थित होते.